या पुरस्काराचा सोहळा एशिया स्तरावर ऑनलाईन महासंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. या पुरस्कारासाठी पंधरा वर्षाचा अनुभव विचारण्यात आला होता. त्यात शैक्षणिक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य जे विद्यार्थ्यांपासून तर समाजापर्यंत केलेले असून शिक्षक उपक्रमशील असावे. नवीन अभ्यासक्रम ऑनलाईन हाताळता आले पाहिजे . एशियाच्या काही नामवंत एज्युकेशन ऑर्गनायझेशन मिळून हे पुरस्कार देत असतात. त्यांचे शिक्षकांना त्यांच्या कामाचे प्रोत्साहन मिळाले पाहिजे जेणेकरुन त्यांचा आपल्या कामाबद्दल प्रेम निर्माण होऊन आपले काम प्रामाणिकपणे व उत्साहाने करीत राहतील. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हे या ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट आहे . महेंद्र सोनेवाने हे आपल्या कामात सकारात्मक भूमिका ठेवून कार्य करीत असतात. वर्षभर वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असतात . कोविडच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत आहेत . उन त्यांना " एशियन एज्युकेशन अवार्ड , २०२१ ” या अवार्डंनी सन्मानित करण्यात आले . प्राचार्य के. एल. पुसाम , गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम, गोकुल परदेशी, ओ.एस.गुप्ता, यशोधरा सोनेवाने, रतिराम भांडारकर, जयंत मुरकुटे, दिपेश सोनेवाने , डॉ. मंगेश सोनेवाने, प्राचार्य आर. आर. सोनेवाने, लक्ष्मण आसटकर, भोजराज रणदिवे , दिनेश रामटेक्कर यांनी कौतुक केले आहे.
महेंद्र सोनेवाने (सुयश)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST