गोंदिया : तिरोडा नगरपरिषद निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक असाटी यांनी तब्बल ३२०० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे तिरोडा नगरपरिषदेवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक असाटी यांना मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांनी आघाडी कायम ठेवत अखेर स्पष्ट बहुमतासह विजय संपादन केला. त्यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षनिहाय जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस - १२ जागा
- भारतीय जनता पार्टी - ६ जागा
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - १ जागा
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) - १ जागा
जरी नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असली, तरी नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्यामुळे तिरोडा नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.
नव्या नगराध्यक्षांसमोर शहराचा विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते विकास यासारख्या मुद्द्यांवर प्रभावी काम करण्याचे आव्हान असणार आहे. अशोक असाटी यांच्या नेतृत्वाखाली तिरोडा नगरपरिषद कोणत्या दिशेने वाटचाल करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Ashok Asati (BJP) won the Tiroda Nagar Parishad president post by 3200 votes. Despite NCP securing 12 seats, BJP's victory shifts political dynamics. Focus now on development, water supply, and infrastructure under Asati's leadership.
Web Summary : अशोक असाटी (भाजपा) ने 3200 वोटों से तिरोड़ा नगर परिषद अध्यक्ष पद जीता। राकांपा को 12 सीटें मिलने के बावजूद, भाजपा की जीत से राजनीतिक समीकरण बदल गए। अब असाटी के नेतृत्व में विकास, जल आपूर्ति और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित किया जाएगा।