शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी माजी आ.राजेंद्र जैन, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थित प्रसन्ना लॉन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले.

ठळक मुद्देसर्वच दिग्गजांचे शक्ती प्रदर्शन : प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती, आता लक्ष ७ ऑक्टोबरकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन नामाकंन दाखल केले. या वेळी उमेदवारांसह त्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुध्दा उपस्थित होते. शुक्रवार हा नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उपविभागीय कार्यालय परिसराला गर्दीचे स्वरुप आले होते.शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी माजी आ.राजेंद्र जैन, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थित प्रसन्ना लॉन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले. गोंदिया मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप जिल्ह्याध्यक्ष हेमंत पटले,नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. रमेश कुथे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, यांच्या उपस्थितीत सर्कस मैदान येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले.तर काँग्रेसचे उमेदवार अमर वºहाडे यांनी शहीद काँग्रेस भोला भवन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले. तिरोडा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी मातोश्री लॉन येथून रॅली काढून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डृू बोपचे यांनी तिरोडा येथील सभागृहात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित सभा घेतली. त्यानंतर जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर,अजय गौर, प्रेम रहांगडाले यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला.आमगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या उपस्थितीत धुकेश्वरी मंदिर परिसरातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.या उमेदवारांसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी नामाकंन दाखल केले.नामाकंन दाखल करण्यासाठी सर्व पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते.प्रचाराला येणार सोमवारपासून रंगतविधानसभा निवडणुकीसाठी नामाकंन दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. तर सोमवारी नामाकंन वापस घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे सोमवारनंतरच जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.सर्वच पक्षात बंडखोरीयंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर करतांना शेवटच्या दिवसांपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करित अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून काँग्रेसमधून बंडखोरी करित राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले,आनंद जांभुळकर यांनी तर भाजपमधून अपक्ष म्हणून पोमेश रामटेके यांनी नामाकंन दाखल केले.तर आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ.रामरतन, नामदेव किरसान यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी नामाकंन दाखल केले.त्यामुळे सर्वच पक्षात बंडखोरी असल्याचे चित्र आहे.खुशाल बोपचे यांचा पुत्रासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशविधानसभा निवडणुकीसाठी नामाकंन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी खा.खुशाल बोपचे आणि त्यांचे पुत्र गुड्डू बोपचे यांनी गुरूवारी रात्री उशीरा खा.प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसेने गुड्डू बोपचे यांना तिरोडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. दरम्यान खुशाल बोपचे यांचा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश भाजपला धक्का मानला जात आहे.आता लक्ष बंडोबांना शांत करण्याकडेसर्व पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले आहे.त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते बंडोबाना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.त्यामुळे यात त्यांना कितपत यश येते हे ७ ऑक्टोबरलाच कळेलच. बंडोबा शांत न झाल्यास पक्षाला याचा फटका बसू शकतो.

टॅग्स :gondiya-acगोंडिया