शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात सरासरी ६६.८६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ३ लाख ६२ हजार २२० अशा एकूण ७ लाख ३२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.८६ टक्के आहे.

ठळक मुद्देमागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत घट : ग्रामीण भागात मतदानाचा टक्का अधिक, जनजागृतीचा परिणाम नाही, प्रशासनाने विचारमंथन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या चारही मतदारसंघात सोमवारी (दि.२१) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण सरासरी ६६.८६ टक्के मतदान झाले. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू असल्याने निवडणूक विभागाने मतदानाची अंतीम आकडेवारी जाहीर केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात निश्चित किती टक्के मतदान झाले हा आकडा स्पष्ट झाला नव्हता. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता २०१४ निवडणुकीच्या तुलनेत चारही मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ३ लाख ६२ हजार २२० अशा एकूण ७ लाख ३२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.८६ टक्के आहे. विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी पाहता अर्जुनी मोरगाव विधानसभा ६९.८६ टक्के, तिरोडा ६५.३४ टक्के, गोंदिया ६४.५५ टक्के, आमगाव ६८.३० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात झाले तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदार अधिक जागृत दिसून आले. नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात अधिक मतदान झाले आहे. विशेष म्हणजे निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. जिल्हा निवडणूक विभागाने यासाठी २९ कि.मी.ची मानवी श्रृंखला तयार करुन मतदार जनजागृती केली. तर पथनाट्य आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी पाहता जनजागृती अभियानाचा कुठलाच फरक पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे अभियान म्हणजे मागे पाठ आणि पुढे सपाट असेच ठरले.२०१४ निवडणुकीत चारही मतदारसंघात अधिक मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मात्र फार कमी मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदानासाठी महिलांमध्ये उत्साह दिसून आला. शहरी भागात मतदानाप्रती फारसा उत्साह दिसून आला नाही. ते मतदानाच्या टक्केवारीवरुन सुध्दा दिसून येते.जनजागृतीनंतरही मतदानाचा टक्का वाढत नसल्याने मंथन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.मतदानातही महिलाच पुढेगोंदिया जिल्ह्यात एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. सोमवारी विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत चार मतदारसंघात एकूण ७ लाख ३२ हजार ८६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात ३ लाख ६२ हजार २२० पुरूष तर ३ लाख ७० हजार ६४८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान करणाऱ्या महिला मतदारांची टक्केवारी ६७.०४ टक्के आहे तर पुरूष मतदारांची टक्केवारी ही ६६.४१ टक्के आहे. त्यामुळे मतदानातही महिलाच पुढे असल्याचे चित्र आहे. .लाखो रुपयांचा खर्च व्यर्थनिवडणूक विभागाने मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. त्यामुळे जनजागृतीवर प्रशासनाने केलेला खर्च सुध्दा व्यर्थ ठरला आहे.शहरी मतदारांमध्ये निरूत्साहजिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात ६८ टक्केवर मतदान झाले आहे. तर त्या तुलनेत शहरी भागात ६४ टक्केच्यावर मतदान झाले आहे. त्यामुळे शहरी भागात मतदानाप्रती मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला. या निरूत्साहामागील नेमके कारण काय हे शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.मतदार वाढूनही टक्केवारीत घटयंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील ३५ हजारावर मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर २६ हजारावर मतदार हे १८ ते १९ वर्ष वयोगटातील आहेत. मात्र यानंतरही चारही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे मतदार वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे चित्र आहे.कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला?जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघात ७० टक्केच्या वर मतदान झाले नाही. सत्तरीच्या आतच सर्व मतदारसंघात स्थिती असल्याने कमी प्रमाणात झालेल्या मतदानाचा नेमका फायदा कुणाला होणार ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया