शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: January 24, 2015 22:58 IST

‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के नुसार हमारे आश्रम नें आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र.

गोंदिया : ‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के नुसार हमारे आश्रम नें आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र. इसके लिए आपको सिर्फ दो हजार ९०० रु पये देने होंगे’, असे कॉल तुमच्या मोबाईलवर आलेत तर सावध रहा. नागरिकांना ‘ईमोशनल ब्लॅकमेल’ करून ठगण्याचे प्रकार वाढले आहेत. टेलिमार्केटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आले आहे. सध्या मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरूनसुद्धा ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे. धार्मिक संभाषण करून आधी भावनिक करायचे आणि नंतर यंत्राचा बाजार मांडून त्याला ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. याला अनेक नागरिक बळीही पडत आहेत. टूर चले हम !जुना गोंदिया येथील रहिवासी अर्जून रावत यांना मोबाईलवर एक फोन आला. आमची बंगलोर येथील प्रसिद्ध टूर कंपनी आहे. कंपनीने मार्च ते मे महिन्यादरम्यान शिमला, मनाली, जम्मू काश्मिरचे टूर आयोजित केले आहे. एका व्यक्तीसाठी १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, कंपनीने आपली भाग्यशाली ग्राहक म्हणून निवड केली असून पती-पत्नी अशा दोघांसाठी कंपनीतर्फे तुम्हाला भव्य सूट दिली जात असून फक्त २० हजार रुपयात टूरची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला दोन दिवसाच्यात आत कंपनीच्या बँक खात्यात ४० टक्के रक्कम जमा करावी लागेल. हे ऐकूण रावत यांना आनंद झाला. विचार करून सांगतो, असे त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला सांगितले. त्यांनी इंटरनेटवर चेक केले असता तशी कंपनीच नसल्याचे स्पष्ट झाले. कर्जासाठी आपली निवड झाली !आमची दिल्लीतील एक प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे. कंपनीने कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी तुमची निवड केली आहे. एक लाखाचे कर्ज तुम्हाला फक्त तीन टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल. कर्ज मिळण्यासाठी आवश्यक ‘प्रोसेसिंग फी’ करिता कर्जाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजे १० हजार रुपये रोख किंवा चेकद्वारे कंपनीच्या खात्यात जमा करा, त्यानंतर चार दिवसात तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल, असा फोन गोंदिया बाजारपेठेतील कपडा व्यापारी जीवनलाल अग्रवाल यांना आला. अग्रवाल त्यांनी जास्त प्रतिसाद न दिल्यामुळे समोरील व्यक्तीने शिविगाळ करून फोन ठेवला. सतर्कतेमुळे त्यांची फसवणूक टळली. अशा प्रकारचे कॉल्स सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईलधारकांना येत आहेत. लालसेपोटी समोरची व्यक्ती अशा कॉल्सच्या जाळ््यात अडकतात व पैसे मिळविण्यासाठी आहे त्या रकमेपासूनही हात धुवून बसतात.