शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रोजच्या समस्या सोडविण्यासाठी लोकाभिमुख चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:14 IST

‘सच कहू तो मेरा अच्छा चल रहा था, मतलब बहुत ही अच्छा! नामवाम था, पैसा था. नार्मली लोग जो चाहते है, वो सब कुछ था! लेकिन धीरे-धीरे अंदर से कुछ तो करना चाहिए, ऐसा मैने अंदर ही अंदर महसूस किया,’ असे बोलून नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार म्हणाले,...

ठळक मुद्देयुवा शक्ती स्पोर्ट्स : रविवारच्या श्रमदानाने पवन तलावाचे संवर्धन

दिलीप चव्हाण ।आॅनलाईन लोकमतगोरेगाव : ‘सच कहू तो मेरा अच्छा चल रहा था, मतलब बहुत ही अच्छा! नामवाम था, पैसा था. नार्मली लोग जो चाहते है, वो सब कुछ था! लेकिन धीरे-धीरे अंदर से कुछ तो करना चाहिए, ऐसा मैने अंदर ही अंदर महसूस किया,’ असे बोलून नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार म्हणाले, लोकांसाठी, समाजासाठी, इथल्या मानसांचे रोजचे प्रश्न सोडविण्यासाठी एक लोकाभिमुख चळवळ निर्माण करावी, ‘युवा शक्ती स्पोर्टस’ आणि मी कामाला लागलो.मी समाजात निर्माण केलेल गुडविल, लोकांशी संवाद साधण्याच्या अत्यंत आणि कमावलेली कृतज्ञता हे माझे प्लस पार्इंट आहेत. तर ते वापरुन काम करता येईल असा विचार अनेक वर्षांपासून माझ्या डोक्यात घोळत असे. या विचारातूनच गोरेगावच्या पवन तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय डोक्यात आला. रविवारी एका तासभराच्या श्रमदानातून पवन तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत असेल तर लाख मोलाचे आहे, असेच मला वाटले. त्यानंतर आपल्या सहकाºयांना घेवून दर रविवारी या तलावाच्या परिसरात श्रमदान करण्यास सुरूवात केली.आपण जेथे जन्मलो, वाढलो, शिकलो व जेथे आपला विकास झाला, त्या गावाच्या विकासासाठी योगदान देणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. याच भावनेतून समाजाच्या व सामान्य माणसाच्या विकासासाठी आपण कार्याला सुरूवात केली.उच्चशिक्षण घेऊनही आपण केवळ समाज हितासाठी राजकीय क्षेत्र निवडून त्या माध्यमातून कार्य करीत आहोत. लोकप्रतिनिधी हा नेहमी संवेदनशील असला पाहिजे, असे आपल्याला वाटते. ही संवेदनशीलता म्हणजे लोकांमध्ये जाऊन केवळ भाषणे ठोकणे नव्हे. लोकांचे प्रश्न काय आहेत. लोकांना कोणता त्रास होतो. लोकांचे दिर्घकाळ प्रश्न का सुटत नाहीत, याचा विचार करणारे संवेदनशील मन असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून आपण राजकारण व समाजकारणात कार्यरत आहोत, असे सांगितले.पवन तलावासाठी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमाला युवकांनी उदंड प्रतिसाद दिला. यासाठी नमन जैन, विकास बारेवार, यश कुंडलवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले, हिमांशू बारेवार,आशिष रहांगडाले, नितीन शेंडे, रवी ठाकूर, राहुल ठाकरे, पुरूषोत्तम साकुरे, अश्विन रूखमोडे, प्रणय वैद्य, लकी ठाकरे, प्रतिक फाये, सुधीर गौंधर्य, प्रवीण बारेवार, पंकज बारेवार, अशोक गिºहेपुंजे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या गाळलेल्या घामाचे फलीत आता येथे येणाºयांच्या आनंदातून व्यक्त होत असल्याचे बारेवार यांनी सांगितले.येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली४५ आठवडे युवकांनी येथे सौंदर्यीकरणासाठी श्रमदान केले. झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. चिमुकल्यांना झुले, घसरणपट्टी, व्यायाम खांब लावले आहेत. वृद्धांसाठी सिमेंटच्या खुर्च्या व कुटी तयार करण्यात आल्या. आजघडीला या ठिकाणी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हिरव्या वृक्षांनी बहरलेल्या परिसरात तरूण व्यायामाच्या दृष्टीकोनातून तर वृद्ध फिरण्यासाठी सकाळ-सायंकाळ येथे येतात व तासनतास घालवित आहेत. शासनामार्फत येथे सुविधा व सौंदर्यीकरणात आणखी वाढ केल्यास येणाऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडेल व भविष्यात पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होवू शकेल.पक्ष्यांसाठी केली पाण्याची सोयउदारमतवादी, दिलदार अन् तेवढाच धाडसी नेता व पक्ष्यांना पाणी पाजणारा माणूस आशिष बारेवार गोरेगाव नगर पंचायतीचे उपाध्यक्ष व सोबतच ‘युवा शक्ती स्पोर्ट्स’ या लोकाभिमुख चळवळीचे संस्थापक आहेत. बारेवार यांनी ‘श्रमदान’ प्रयोगाची सुरुवात करून आपले जनतेप्रति असलेले उत्तरदायित्व सिध्द केले. त्यांनी तब्बल ४५ रविवार आपल्या मित्र कार्यकर्त्यासोंबतच श्रमदान करुन पवनतलावाचा कायापालट केला. शहरात एखादे विकास काम झाले तर नवलाईची बाब असते, पण तब्बल ४५ रविवार श्रमदान करून पवनतलावाचा कायापालट करण्याचा संकल्प घेण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाला शोभेल असे सातत्य असावे लागते. राजकीय समन्वय, सामाजिक इच्छाशक्ती, व्यवस्थापकीय कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य या गुणांच्या सुरेख संगमामुळे बारेवार या तरुणाने व समाजसेवकाने अशक्य वाटणारे सारे हे कार्य शक्य करुन दाखवित गोरेगाववासीयांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.