शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नागरिकांकडून होतेय ‘लॉकडाऊन’चा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरिता महिलांनी बँकेत गर्दी केली होती.

ठळक मुद्देबँकेसमोर एकच गर्दी : ‘सोशल डिस्टन्सिंग’चा उडाला फज्जा, पैसे काढण्याची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ आहे. मात्र नागरिक सर्रास ‘लॉकडाऊन’चा भंग करीत असल्याचे चित्र मंगळवारी येथील बॅक ऑफ महाराष्ट्रसमोर बघावयास मिळाले. नागरिकांकडूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडविला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला आहे.मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरिता महिलांनी बँकेत गर्दी केली होती.नियमानुसार बँकेने ग्राहकांसाठी आत प्रवेश करताना ‘सोशल डिस्टन्सिंगचे’ पालन करून एका-एका व्यक्तीला प्रवेश दिला जात होता. मात्र बँकेच्या गेटजवळ व बाहेर उभ्या ग्राहकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र दिसून येत होते. आपले काम लवकर व्हावे यासाठी ग्राहकांनी जवळ-जवळ उभे राहून गर्दी केली होती.त्यामुळे ‘लॉकडाऊन’ व ‘सोशल डिस्टन्सिंग’चा सर्रास भंग होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. बँक कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ग्राहकांना समजवून सांगितल्यानंतरही ते ऐकत नसल्याचे सांगितले.ग्रामपंचायतने केली व्यवस्थाग्रामपंचायत साखरीटोलाच्यावतीने (सातगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन बँकेसमोर पेंडालची व्यवस्था करून नागरिकांना विशिष्ट अंतर ठेवावे जेणे करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली आहे. ठाणेदार राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनात येथे सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतन पालन व्हावे याकरिता पथक तयार करण्यात आले आहे.

टॅग्स :bankबँकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस