शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

लॉकडाऊनमुळे ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. भाग १ ते ५ या सदराखाली मागील वर्षी ८१३ गुन्हे मे अखेरपर्यंत दाखल करण्यात आले होते. सन २०२० मध्ये मे अखेरपर्यंत ४७४ गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे८० टक्के गुन्हे उघडकीस : दरोडा आणि चोरीच्या घटनांवर बसला आळा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्ह्यांची टक्केवारी वाढणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा कोरोना विषाणूचा कहर सुरू असल्याने मागील अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मागील वर्षी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७५ टक्के होते. तर यंदा हे प्रमाण ८० टक्के आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. भाग १ ते ५ या सदराखाली मागील वर्षी ८१३ गुन्हे मे अखेरपर्यंत दाखल करण्यात आले होते. सन २०२० मध्ये मे अखेरपर्यंत ४७४ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच यंदा लॉकडाऊनमुळे ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्के गुन्ह्यांनी घट झाली आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी या मालमत्ता संबधी मागच्या वर्षी २९१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदाच्या ५ महिन्यात १८० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६७ गुन्ह्यांनी घट आहे. ह्या गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचे प्रमाण मागच्या वर्षी ३५ टक्के होते तर यंदा ६० टक्के आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलने यंदा २५ टक्याने वाढले आहे. शारीरिक विरूध्दचे गुन्हे (मारहाण) मागच्या वर्षी २८१ घडले होते यंदा त्यात १०६ गुन्ह्यांनी घट झाली आहे. यंदा १७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३८ टक्यांनी शरीराविरूध्दच्या गुन्ह्यांनी घट झाली आहे.होऊ लागले महिलांचे संरक्षणमहिलांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. त्याचा एक भाग व कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे महिलांचे संरक्षण होऊ लागले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या मागील वर्षात मे महिन्यापर्यंत १५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाच महिन्यात ६७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८५ गुन्ह्यांनी घट झाली असून त्याचे प्रमाण ५६ टक्याने घटले आहे. महिलांचे संरक्षण आता होऊ लागले आहे.विनयभंगाच्या गुन्ह्यात झाली घटअपरहणाचे गुन्हे मागील वर्षी ४९ तर यंदा १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे अपहरणाच्या ३४ गुन्ह्यांनी घट झाली आहे. बलात्कारचेही प्रमाण घटले आहे. मागच्या वर्षीच्या पाच महिन्यात ३१ बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदा १७ गुन्ह्यांची नोंद झाली असून १४ गुन्ह्यांनी घट झाली आहे. विनयभंगाच्या ७२ तक्रारी मागच्या वर्षी पोलिसांनी दाखल केल्या होत्या. यंदा ३६ गुन्ह्यांची नोंद झाली असून ३६ गुन्ह्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.कोरोनाशी लढता-लढता गुन्हे घडू नयेत याकडे पोलिसांनी लक्ष दिले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांतील आरोपीपर्यंत पोहचून त्यांना जेरबंद करण्याचे काम पोलीस करीत आहे. मागच्या वर्षीची व यंदाची पाच महिन्याची तुलाना केल्यास ४२ टक्के गुन्हे यंदा घटले आहेत.- मंगेश शिंदेपोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस