शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गणेशनगरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

पालकमंत्री देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला खा. पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा। प्रफुल पटेल यांच्या चर्चेनंतर दिले निर्देश, आढावा बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गणेशनगर परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर प्रशासनाने सील केला होता. मात्र सदर रुग्ण कोरोनामुक्त झाला असून यानंतरही या भागात कठोर नियम कायम ठेवण्यात आले होते. यामुळे या भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे गणेशनगर परिसरातील नियमात शिथिलता देण्यात यावी, यासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) गणेशनगर परिसरातील नियम शिथिल करु न त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करु न दैनंदिन व्यवहार व व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली.पालकमंत्री देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला खा. पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते. बैठकीत खा. पटेल यांनी गणेशनगर परिसरातील जीवनावश्यक वस्तुंचा व्यापार करणारे व्यापारी, वैद्यकीय व्यवसाय करणारे, लहान मोठे व्यापारी रहिवासी डॉक्टर्स यांना गणेशनगर परिसरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी अधिकायाºंसोबत चर्चा केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी यात दिंरगाई केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना चांगलेच फटकारले. एखाद्या आवश्यक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास तो होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी गणेशनगर परिसरात शनिवारी सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत केले जाईल असे सांगितले. पालकमंत्री देशमुख यांनी याची गांर्भियाने दखल घेत अधिकाºयांना योग्य निर्देश दिले. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याविषयी चर्चा केली. यावेळी खा. पटेल यांनी रबी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र व त्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास सांगितले. ‘लॉकडाऊन’मुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे यासाठी मग्रारोहयोची कामे त्वरीत सुरू करण्यास सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी, तसेच आरोग्य कर्मचाºयांची पदे भरण्यात यावी, ग्रामीण भागातील गोरगरीबांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा कशा मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्या निवेदनावर प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री देशमुख यांनी यासर्व विषयांवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तर खा. पटेल यांनी गोरेगाव नगरपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत तेथील साफसफाईकडे लक्ष देण्यास सांगितले.मेडिकलच्या डॉक्टरांना ४ महिन्यांचे वेतनयेथील शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील ६-७ महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. ही बाब डॉक्टरांनी खा. पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी दोन दिवसांपूर्वी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. यावर त्यांनी ३ मे पर्यंत डॉक्टरांच्या वेतनासाठी ५८ लाख रु पये त्वरित उपलब्ध करु न देण्यात येत असून यातून ४ महिन्यांचे वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले.डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तीन हजार पीपीई किटखा. पटेल यांनी कोरोनासाठी उपाययोजनांवर विस्तृत चर्चा केली. त्यात जिल्ह्यासाठी ३ हजार पीपीई कीटची मागणी केली असून केवळ ३०० किट उपलब्ध झाल्या असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. याची खा. पटेल यांनी गांर्भियाने दखल घेत तातडीने पीपीई किटची मागणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले.तेंदूपत्याशी निगडीत घटकांना परवानगीपूर्व विदर्भात तेंदूपत्ता हंगाम मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळतो. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ज्या यंत्रणा काम करतात त्यांना जिल्ह्याबाहेर तेंदूपत्याची लोंडीग-अनलोंडीग करण्याची परवानगी देण्यासंदर्भात या वेळी चर्चा झाली. त्यात पोलीस अधीक्षक शिंदे यांनी परवानगी देणार असल्याचे सांगितले.पटेल यांच्या सहकार्याने मार्ग - विनोद अग्रवालगणेशनगर परिसरात प्रशासनाने लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देण्यात यावी यासाठी मागील १५ दिवसांपासून शासन आणि प्रशासनाकडे आपला पाठपुरावा सुरू होता. अखेर गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी या परिसरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल करण्याचे आदेश दिले. यामुळे गणेशनगरवासीयांना दिलासा मिळाला असून यासाठी खा. पटेल यांचे सहकार्य मिळाल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगितले.पाठपुराव्यानंतर निघाला मार्ग - गोपालदास अग्रवालगणेशनगर परिसरात प्रशासनाने ‘लॉकडाऊन’चे नियम कठोर केल्याने या भागातील नागरिक व व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर गणेशनगर परिसरातील ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता दिल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या