शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१३० जि.प. शाळांवर जिवंत वीज तारा ! विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:41 IST

चिमुकल्यांवरील संकट कायम : १० कोटींच्या घरात खर्च अपेक्षित

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिकत आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १,६४४ पैकी तब्बल १३० शाळांच्या परिसरातून जिवंत वीज वाहिन्या गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जिवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका आहे. हे चिमुकल्यांवरील संकट कायम असून, या जिवंत वीज वाहिन्या हटविण्यासाठी प्रश्न वारंवार पुढे येत असूनही याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही.

जिल्हा परिषदअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३० शाळांच्या इमारतीवरून विजेच्या जिवंत वाहिन्या गेल्या आहेत. अनेक शाळांच्या आवारातच वीज रोहित्र लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता, कधीही वादळामुळे एखादी जिवंत वाहिनी तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून इमारतीवरील वाहिन्या काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेने ठराव घेण्यात आला होता, परंतु या जिवंत वीज वाहिन्या अजूनपर्यंत हटविण्यात आल्या नाही. त्यावेळी वीज विभागाने सर्वेक्षण करून येणाऱ्या खर्चाचे आराखडे तयार केले होते, पण निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच पडून होता. त्यानंतर, ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते, परंतु त्यांनीही ते पूर्ण केले नाही. 

तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळांवर वाहिन्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर संकट ओढावणाऱ्या जिवंत वीज वाहिन्या व रोहित्रांची चौकशी केली असता, तिरोडा तालुक्यातील ३६ शाळांच्या आवारातून वाहिन्या गेल्या आहेत. गोरगरिबांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी या जिवंत वीज वाहिन्या शाळेच्या परिसरातून हटविण्याची गरज आहे. यासाठी आता १० कोटींच्या घरात रक्कम लागणार आहे.

त्यावेळी होता ६.५० कोटींचा खर्च जिल्हा परिषदेद्वारा चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३० शाळांच्या इमारतीवरून वीज वाहिन्या गेल्या आहेत. कित्येक शाळांच्या आवारात रोहित्र लागले आहे. शाळांच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याने ते काढण्यात यावे, असा प्रस्ताव जि.प. सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्यानुसार, वीज मंडळाने कारवाई सुरू करून सर्वेक्षण केले. वीज मंडळाला या कार्यासाठी सहा कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. एवढा निधी आणायचा कुठून, हा प्रश्न जिल्हा परिषद व वीज कंपनीपुढे उभा ठाकला होता.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाgondiya-acगोंदियाelectricityवीज