शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

जिल्हावासीयांना थोडी खुशी थोडा गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:00 AM

जिल्ह्यात १९ मे पासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असूृन हे सर्व मुंबई, पुणे या शहरातून आलेले आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली होती. तर शुक्रवारी (दि.२९) गोंदिया तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्दे२८ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त : गोंदिया तालुक्यात वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी गुरूवार आणि शुक्रवारी (दि.२९) एकूण २८ कोरोना बाधीत रुग्ण कोरानामुक्त झाले. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा तीन नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६२ वर पोहचला असला तरी यापैकी २८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी शुक्रवारी थोडी खुशी थोडा गम असेच वातावरण होते.जिल्ह्यात १९ मे पासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असूृन हे सर्व मुंबई, पुणे या शहरातून आलेले आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली होती. तर शुक्रवारी (दि.२९) गोंदिया तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६२ पोहचला. पण एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी गुरूवारपर्यंत ३ आणि शुक्रवारी २५ असे एकूण २८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकाच दिवशी तब्बल २५ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची ही विदर्भातील पहिलीच घटना असून यामुळे जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३४ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही बाब निश्चित जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तेवढीच चिंता वाढली आहे.कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरणगोंदिया क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधीत रुग्णांवर मागील आठ ते दहा दिवसांपासून उपचार सुरू आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण सातत्याने वाढ आहे. मात्र शुक्रवारी येथील तब्बल २५ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे सदैव तणावाखाली असलेल्या सेंटरमधील वातावरण काहीसे आनंदायी होते. डॉक्टर आणि परिचारिकांनी सुध्दा कोरोनामुक्त झालेल्यांचे पुष्षगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून निरोप दिला.८३१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ९५० जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ८३१ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ५४ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप नागपूर येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आणि संस्थामध्ये ३९६४ जण क्वारंटाईन आहेत तर ८८४५ जण होम क्वारंटाईन आहेत.जिल्ह्यात आता १९ कंटेनमेंट झोनजिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) पुन्हा तीन नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली असून हा आकडा आता १९ वर पोहचला आहे. यात गोंदिया तालुक्यात नवरगाव कला, कटंगी, परसवाडा, सालेकसा तालुक्यात धनसुवा, सडक अर्जुनी तालुक्यात तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली. गोरेगाव तालुक्यात गणखैरा, गोरेगाव येथील भंगाराम चौक, आंबेतलाव,तिरोडा तालुक्यात तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यात करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या