लोकमत न्यूज नेटवर्कबिजेपार : आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, ती येण्यापूर्वीच तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक एस.डी. कराडे यांनी केले.मक्काटोला येथील पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राज्य आपत्ती व्यवस्थापन दल नागपूर द्वारे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी. मेश्राम होते. पाहुणे म्हणून नागपूरचे पोलीस निरीक्षक एस.डी. कराडे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, पोलीस उपनिरीक्षक पी.एस. नेमाने, पोलीस उपनिरीक्षक जी.आर. दुगा, पशुवैद्यकीय अधिकारी पी.एन. सहारे, सरपंच रामप्रसाद दोनोडे, पोलीस पाटील जितेंद्र बडोले व हेड कॉन्स्टेबल किशोर टेंभुर्णे उपस्थित होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व पाहुण्यांचे गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे पोलीस निरीक्षक कराडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह भूकंप, महापूर, अपघात, नैसर्गिक वीज पडणे, आग इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या चमूसह विद्यार्थी, शिक्षक, पालक व उपस्थित गावकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर करून दाखविले.या वेळी प्राचार्य मेश्राम यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना आपत्ती व्यवस्थापनाविषयी घरी, गावात व परिसरात जाणीवजागृती करण्यास सांगितले.प्रास्ताविक मांडून संचालन विज्ञान शिक्षक रामटेके यांनी केले. आभार आर.एम. मुनेश्वर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:28 IST
आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, ती येण्यापूर्वीच तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक एस.डी. कराडे यांनी केले.
जीवन रक्षणाचा मंत्र म्हणजे आपत्ती व्यवस्थापन
ठळक मुद्देएस.डी. कराडे : आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा