शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप; जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल 

By नरेश रहिले | Updated: January 31, 2024 18:53 IST

दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

गोंदिया: दारूपिऊन घरी आलेल्या लहान भावाला मोठा भाऊ रागावत असल्याने याचा राग मनात धरून मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या लहान भावाला जिल्हा न्यायालय-२ व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी ३१ जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी केली आहे. भरत मदनकर (६२) रा. सौदंड ता. सडक-अर्जुनी जि. गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी भरत मदनकर रा. सौंदड याचा मृतक पंढरी धोंडू मदनकर हा सख्खा भाऊ होता. आरोपी व मृतक यांच्या शेतीची हिस्से-वाटणी झाली. ते एकमेकांच्या लगत होते. आरोपी दारूपिऊन घरी आल्यावर मृतक पंढरी (७२) हा कधीकधी त्याला रागवत होता. त्यामुळे आरोपी हा पंढरी यांचा राग धरून चिड करीत होता. त्यांच्याशी बोलत नव्हता. त्याचाच राग मनात धरून ५ जून २०१९ रोजी आरोपीने पंढरी धोंडू मदनकर याला शेतावर एकटा पाहून धारदार शस्त्राने डोक्यावर मारून ठार केले होते. पंढरी यांची पत्नी सुमित्रा मदनकर ही दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान शेतावर गेली. तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला. पंढरी हे शेतावरील झोपडीमध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळले. यासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक विजय पवार यांच्या देखरेखीत पैरवी पोलीस हवालदार रविशंकर चौधरी यांनी केली आहे. ११ साक्षदार तपासलेआरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी यांनी एकुण ११ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील महेश चंदवानी यांच्या युक्तीवादानंतर कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल या आधारावर जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला कलम ३०२ अतंर्गत आजन्म सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCourtन्यायालय