शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

गोंदिया, तिरोडा तालुक्यातील ९१ कृषी केंद्राचे परवाने केले कायमस्वरुर्पी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:21 IST

भरारी पथकांची कारवाई : अनियमितता आढळल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून, गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने ९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द, तर आठ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणामुळे ८ कृषी केंद्रांचे परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित केले. शेतकऱ्यांना त्यांच्यात गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते. परंतु, कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडलेले नव्हते. 

हे कृषी केंद्र दोन महिन्यासाठी निलंबित एस.आर. कृषी केंद्र दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटक- नाशके परवाना दोन महिन्यांकरिता, शेतकन्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी, दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, मो. गायत्री कृषी केंद्र मेंढा, ता. तिरोडा बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यां- करिता, असे एकूण आठ परवाने निलंबित करण्यात आले आहे. 

या कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द आगाशे कृषी केंद्र महालगाव ता. गोंदिया, जय किसान कृषी केंद्र रतनारा, ता. गोंदिया, माँ शारदा कृषी केंद्र रतनारा, महालक्ष्मी कृषी केंद्र रतनारा, प्रगती कृषी सेवा केंद्र रतनारा, वैनगंगा कृषी केंद्र महालगाव, पराते कृषी केंद्र हलबीटोला, रवी ट्रेडर्स व कृषि केंद्र एकोडी, संकल्प कृषी केंद्र लोधीटोला, राधाकृष्ण कृषी केंद्र डोंगरगाव, दोनोडे कृषी केंद्र धापेवाडा, अग्रवाल कृषी केंद्र, हेमने कृषी केंद्र मोरवाही, के.एम.पी. कृषी केंद्र, खते व किटकनाशके, पारधी कृषी केंद्र टेमनी, गजभिये कृषी तिरोडा, मलेवार कृषी केंद्र केसलवाडा, रहांगडाले कृषी केंद्र बेलाटी बु, शेंडे कृषी केंद्र पिंडकेपार, रेणुका कृषी केंद्र बिरसी, एम. एम. खोब्रागडे कृषी केंद्र ठाणेगाव, त्रिशिका कृषी केंद्र परसवाडा, समिर कृषी केंद्र मुंडिपार, कुंज कृषी केंद्र बेरडीपार, नरेश कृषी केंद्र सेजगाव, याची कृषी केंद्र ठाणेगाव, भेलावे कृषी केंद्र वडेगाव, मोहारे कृषी केंद्र मुंडीकोटा, ओम साई कृषी केंद्र पिपरीया, न्यु लोहिया कृषी केंद्र नवेझरी बियाणे, पारधी कृषी केंद्र वडेगाव, अन्नपूर्णा कृषी केंद्र, कटरे कृषी केंद्र मुंडीकोटा, सोनवाने कृषी केंद्र वडेगाव, गौतम कृर्षी केंद्र जमुनिया, प्रतीक्षा कृषी केंद्र ठाणेगाव, डोंगरे कृषी केंद्र अशा गोंदिया तालुक्यातील ४१ व तिरोडा तालुक्यांतील ५० परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले.

"खते, बियाणे खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडून पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल." - अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदियाAgriculture Sectorशेती क्षेत्र