शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाचशे पालक लिहिणार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:26 IST

शहरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पाठपुस्तके शाळेतून घेण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीच्या नावावर पाठपुस्तकांच्या मुळ शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल करुन पालकांची त्यांच्या डोळ्यादेखत लूट केली जात आहे. हा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर शहरातील पालकांनी खासगी शाळा व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला. शाळांच्या मनमानी धोरणाला चाप लावण्याच्या मागणीसाठी पाचशे पालक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविणार आहे.

ठळक मुद्देखासगी शाळांची मनमानी थांबवा : शिक्षण विभागाने त्वरित कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पाठपुस्तके शाळेतून घेण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीच्या नावावर पाठपुस्तकांच्या मुळ शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल करुन पालकांची त्यांच्या डोळ्यादेखत लूट केली जात आहे. हा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर शहरातील पालकांनी खासगी शाळा व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला. शाळांच्या मनमानी धोरणाला चाप लावण्याच्या मागणीसाठी पाचशे पालक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविणार आहे.मागील दोन तीन वर्षांपासून खासगी शाळांची मनमानी वाढत चालली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.पाठपुस्तकांच्या मुळ किंमतीवर शाळा ८० ते ९० रुपयांचे शुल्क आकारत आहे. शिवाय शैक्षणिक शुल्कात दरवर्षी ५ ते १० टक्के वाढ करीत आहे.पालकांनी शाळेतून पाठपुस्तके घेण्यास विरोध केल्यास त्यांना पटत नसेल तर आमच्या शाळेत प्रवेश घेवू नका असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे खासगी शाळांची एकप्रकारे मनमानी सुरू आहे. मात्र पालक हा सर्व प्रकार आपल्या पाल्यांचे नुकसान होवू नये म्हणून हे सर्व मुकाट्याने सहन करीत आहे. लोकमतने हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर शहरातील पालकांनी खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शिक्षण विभाग व प्रशासनाने वेळीच उपाय योजना करण्याची मागणी केली.शहरातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर सुध्दा या विषयावर पालकांमध्ये जोरदार चर्चा रंगली. गोंदिया विधानसभा व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांनी खासगी इंग्रजी शाळांची मनमानी थांबविण्याची गरज असून शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधीनी सुध्दा हा मुद्दा लावून धरुन खासगी शाळांकडून सक्तीच्या नावावर सुरू असलेली लूट थांबविण्याची व धडक कारवाई करण्याची मागणी केली.गोंदिया विधानसभा व्हॉट्सअप ग्रुप घेणार पुढाकारखासगी शाळांकडून पाठपुस्तके, शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याच्या सक्तीच्या नावावर पालकांची लूट केली जात आहे. याबाबत काही पालकांनी तक्रार केली. मात्र तक्रार करणाºया पालकांनाच शाळा व्यवस्थापनाकडून उलट उत्तर दिले. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे.गोंदिया विधानसभा गु्रपने याची दखल घेत या विषयावर चर्चा केली.जिल्हा प्रशासनाने यावर वेळीच कारवाई कारवाई करावी, यासाठी जिल्हाधिकाºयांना पाचशे पत्र पाठविण्याचा संकल्प केला आहे.सोईसुविधांचे कायशहरातील बऱ्याच खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून दरवर्षी सोईसुविधांच्या नावावर शैक्षणिक शुल्कात वाढ केली जात आहे. तर जेवढे शुल्क भरले त्याची रितसर पावती देणे टाळले जाते. पालकांकडून मनमानी शुल्क वसूल करुन शाळांमध्ये सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.शुल्कवाढीवर नियंत्रण कुणाचे?खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून दरवर्षी शैक्षणिक शुल्कात ५ ते १० टक्के वाढ केली जात आहे.यामुळे कॉन्व्हेंटचे शुल्क २० ते २५ हजार रुपये आहे.दरवर्षीच्या शुल्क वाढीमुळे पालक देखील हैैराण असून खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्क वाढीवर कुणाचेच नियंत्रण नाही का? असा सवाल पालकांकडून केला जात आहे.अधिकाऱ्यांनी द्यावी शाळेला भेटखासगी शाळांकडून पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. काही शाळांमध्ये याची दुकानदारी थाटलेली आहे. त्यामुळे यासर्व प्रकाराची वास्तविकता जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी शाळांना भेटी देवून कारवाई करण्याची मागणी सुध्दा पालकांनी केली आहे.शाळांना परवाना आवश्यकशहरातील काही शाळांमध्ये पाठपुस्तकांची विक्री केली जात आहे. मात्र यासाठी शाळांना पाठ्यपुस्तके विक्री करण्यासाठी नगर परिषदेकडून व संबंधित विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पुस्तकांची विक्री करता येत नाही. अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे.शाळेतूनच पुस्तके घेण्याची सक्ती खासगी शाळांना करता येत नाही. पालकांनी याची तक्रार केल्यास संबंधित शाळांवर आरटीई अंतर्गत कारवाई केली जाईल. कुठल्या शाळेत असा प्रकार सुरू असल्यास पालकांनी याची शिक्षण विभागाकडे थेट तक्रार करावी. तक्रार करणाºया पालकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी प्राथमिक