शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या बछड्याचे रेस्क्यू यशस्वी; शेतशिवारात दडी मारुन बसलेला बछडा

By अंकुश गुंडावार | Updated: January 22, 2024 17:25 IST

केळवद शेतशिवारातील घटना : नवेगावबांध येथील रेस्क्यू टीमला केले पाचारण

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिट केशाेरी येथील कक्ष क्रमांक ७५० मधील केळवद येथील शेतशिवारात एक बिबट्याचा बछडा दडी मारून बसला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नवेगावबांध येथील रेस्क्यू पथकाला पाचारण केले. या पथकाने बिबट्याच्या बछड्याला यशस्वीपणे रेस्क्यू केले. ही घटना आज (दि.२२) घडली.

प्राप्त माहितीनुसार, केशोरीलगत असलेल्या केळवद शेतशिवारात आंब्याच्या झाडाखाली झुडुपात एक बिबट्याचा बछडा दडून बसला असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांना आढळला. त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच, वनपरीक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी अधिकारी एम.सी.पवार हे घटनास्थळी पाेहोचले. त्यांनी घटनास्थळी बिबट्याच्या बछड्याची पाहणी करून, त्याचे रेस्क्यू करण्यासाठी नवेगावबांध येथील रेस्क्यू चमूला पाचारण केले. यानंतर, या चमूने सोमवारी दुपारी घटनास्थळी पोहोचत, बिबट्याच्या बछड्याला यशस्वीपणे रेस्क्यू केले. बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद करून त्याला नवेगावबांध येथे नेण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या हा बछडा नवेगावबांध येथे असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यांनी राबविली रेस्क्यू मोहीम

केळवद परिसरातील शेतशिवारातून बिबट्याच्या बछड्याला नवेगावबांध येथील रेस्क्यू टीमने यशस्वीपणे पकडले. यानंतर, त्याला उपचारासाठी नवेगावबांध येथे नेण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केशोरीचे क्षेत्रसहायक नान्हे, वनरक्षक यू.बी.काळसर्पे, एस.परशुरामकर, ए.गवाले, जी.पटले, जायभाये, टी.कोरे, वनमजूर मेंढे व रेस्क्यू चमूचे मिथून चव्हाण, अमोल चौबे, सतीश शेंद्रे यांचा समावेश होता.

टॅग्स :gondiya-acगोंदियाleopardबिबट्या