शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
2
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
3
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
4
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
7
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
8
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
9
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
10
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
11
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
12
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
13
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
14
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
15
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
16
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
17
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
18
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
19
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
20
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे हल्ले थांबेनात ! वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीचा घेतला जीव; परिसरात दहशत

By अंकुश गुंडावार | Updated: November 29, 2025 20:39 IST

इंदोरा निमगाव येथील घटना : दुसरा बळी जाण्यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी

सुकडी-डाकराम : वडीलांसोबत शेतात गेलेल्या बालिकेवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला. रुची देवानंद पारधी (वय ९वर्ष) रा. इंदोरा निमगाव असे मृतक बालिकेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी रुचा ही तिच्या वडीलांसोबत शेतावर गेली होती. वडील ताराचे कुंपन लावण्याचे काम करीत होती. तर रुची ही शेतातील बांधीत उभी होती. दरम्यान दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करुन तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजुबाजुच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचाला सोडून देत जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुचाला तिचे वडील शेतकऱ्यांनी त्वरित स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला.

पंधरा दिवसांपासून बिबट्याने घातला धुमाकूळ

तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव, सुकडी डाकराम परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Attacks Continue: Child Dies in Field; Panic Spreads

Web Summary : A nine-year-old girl died after a leopard attack in Tiroda. She was with her father in the field when the incident occurred. The leopard dragged her away before fleeing. Locals are demanding action from the forest department due to increased leopard activity in the area.
टॅग्स :leopardबिबट्या