शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा हल्ला, तीन वर्षांच्या चिमुकल्याला नेले ५० मीटर फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:28 IST

गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बचावला चिमुकला: आठ-दहा दिवसांपासून आहे बिबट्याची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क गोठणगाव : घरच्या छपरीत खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास ५० मीटर फरफटत नेल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे रविवारी (दि. १) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.

प्राप्त माहितीनुसार, गोठणगाव येथील प्रभाग क्रमांक तीन येथील दयाराम साखरे यांचा भाचा मृदुल रुपये नंदेश्वर (३) हा आई-वडिलांसह मंडईनिमित्त आला होता. रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृदुल मामाच्या घरी छपरीत खेळत होता. तर घरातील मंडळी आपल्या कामात व्यस्त होती. दरम्यान, बिबट्याने साखरे यांच्या घरासमोर प्रवेश करून छपरीत खेळत असलेल्या चिमुकल्या मृदुलच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेले. यामुळे मृदुलच्या रडण्याचा आवाज येताच रंजित साखरे धावत आले. बिबट्या मृदुलला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी व गावकरी धावत आले, त्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबटवाने मृदुलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला.

बिबट्याने मृद्दलच्या मानेला पकडल्याने तो यात जखमी झाला. त्याला लगेच गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी गोठणगाव येवे दाखल होत माहिती घेऊन पंचनामा केला.

अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर गोठणगाव हे जंगल परिसराला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्याचा वापर असतो. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या रात्रीच्या वेळेस गापात प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी बिबट्याने गावात प्रवेश करून चिमुकल्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याने गाय- कन्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकथांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याgondiya-acगोंदिया