शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

अखेर पूर्ण झाली ‘दत्तक आदर्श ग्राम’ची यादी

By admin | Updated: December 24, 2014 23:03 IST

ठरवून दिलेल्या मुदतीच्या सुमारे अर्धा महिना लोटून गेल्यानंतर अखेर दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांच्या अनास्थेमुळे पंचायत विभागाला

गोंदिया: ठरवून दिलेल्या मुदतीच्या सुमारे अर्धा महिना लोटून गेल्यानंतर अखेर दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांच्या अनास्थेमुळे पंचायत विभागाला ही यादी पूर्ण करण्यास उशिर झाला आहे. त्यातही विभागाकडून सदस्यांना फोन करून दत्तक गावांची नावे घेऊन ही यादी कशीबशी पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. यास उशिर झाल्यामुळे मेळाव्यांच्या आयोजनावरही परिणाम जाणवत आहे. देशभरात राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाला बघता आपल्या जिल्ह्यातही असा काही उपक्रम राबविला जावा या उद्देशातून जिल्हा परिषदेने आदर्श दत्तक ग्राम उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी आपल्या क्षेत्रातील निवड केलेल्या गावांचे नाव पंचायत विभागाकडे द्यायचे होते. मात्र या उपक्रमाप्रती जिल्हा परिषद सदस्यांची अनास्था अगोदरपासूनच दिसून येत होती. त्यामुळेच दिलेल्या मुदतीत अर्ध्यापेक्षाही कमी सदस्यांच्या गावांची नावे पंचायत विभागाकडे आली होती. जिल्हा परिषद सदस्यांच्या या उदासिनतेचा सर्वत्र वेगळाच संदेश जात असल्याने अखेर पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांनी सदस्यांना फोन करून त्यांनी निवडलेल्या गावांची नावे घेण्याचे काम सुरू केले. अखेर मुदतीनंतर अर्धा महिना उलटून गेल्यावर ५१ सदस्यांच्या दत्तक आदर्श गावांची यादी पूर्ण झाली आहे. या यादीनुसार, गोंदिया तालुक्यातील काटी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य नरेंद्र तुरकर यांनी कासा या गावाची निवड केली आहे. तर गर्रा खुर्द क्षेत्राच्या सदस्य उषा बरडे यांनी बनाथर, कामठा क्षेत्राचे सदस्य कुंदन कटारे यांनी छिपिया, सावरीचे सदस्य नेतराम कटरे यांनी अंभोरा, नागराचे सदस्य रमेश लिल्हारे यांनी लहीटोला, दासगाव खुर्दचे सदस्य रूद्रसेन खांडेकर यांनी किन्ही, दवनीवाडाचे सदस्य अर्जुन नागपुरे यांनी महालगाव, एकोडीच्या सदस्य मिना सोयाम यांनी पारडीबांध, डोंगरगावचे सदस्य मुनेंद्र नांदगाये यांनी चुटीया, कुडवाचे सदस्य बाळकृष्ण पटले यांनी कुडवा, खमारीचे सदस्य जगदीश बहेकार यांनी तुमखेडा खु., फुलचूरचे सदस्य राजेश चतूर यांनी ढाकणी; तिरोडा तालुक्यातील अर्जुनीचे सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांनी बाघोली, सेजगावचे सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी बेरडीपार, कवलेवाडाच्या सदस्य तेजेश्वरी भोंगाडे यांनी भंबोडी, सरांडीचे सदस्य पंचम बिसेन यांनी गांगला, वडेगावचे सदस्य विष्णू बिंझाडे यांनी कोयलारी, सुकडीचे सदस्य मदन पटले यांनी पिंकडेपार; आमगाव तालुक्यातील किकरीपारच्या सदस्य उषा हर्षे यांनी कालीमाटी, आमगावचे सदस्य विजय शिवणकर यांनी रिसामा, गोरठाच्या सदस्य योगेश्वरी पटले यांनी बुराडीटोला, ठाणाचे सदस्य टुंडीलाल कटरे यांनी बोथली, पदमपूरचे सदस्य रमेश बहेकार यांनी किडंगीपार, घाटटेमनीच्या सदस्य संगीता दोनोडे यांनी सितेपार; सालेकसा तालुक्यातील सालेकसा (झालीया)च्या सदस्य देवकी नागपुरे यांनी बाम्हणी, पिपरीयाच्या सदस्य प्रेमलता दमाहे यांनी पिपरीया, आमगाव खुर्दच्या सदस्य कल्याणी कटरे यांनी धानोली, कारूटोलाचे सदस्य श्रावण राणा यांनी कारूटोला; देवरी तालुक्यातील पुराडाच्या सदस्य सविता पुराम यांनी ओवारा, गोटाबोडीचे सदस्य राजेश चांदेवार यांनी मुरदोली, देवरीच्या सदस्य पार्वता चांदेवार यांनी शिरपुरबांध, ककोडीचे सदस्य संदीप भाटीया यांनी केशोरी, चिचगडचे सदस्य तुळशीराम गहाणे यांनी पिपरखारी; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधचे सदस्य मधूकर मसरकोल्हे यांनी सिरेगावबांध, गोठणगावच्या सदस्य मिना राऊत यांनी झाशीनगर, बोंडगावदेवीचे सदस्य अरविंद शिवणकर यांनी पिंपळगाव, अर्जुनी मोरगावच्या सदस्य सुरेखा नाईक यांनी कुंभीटोला, महागावच्या सदस्य किरण कांबळे यांनी बुटाई क्रमांक २, केशोरी चे सदस्य प्रकाश गहाणे यांनी वारवी, ईटखेडाचे सदस्य उमाकांत ढेंगे यांनी ईटखेडा; सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरीचे सदस्य चंद्रकांत मरसकोल्हे यांनी मुरपार/ले., डव्वाच्या सदस्य किरण गावराने यांनी डव्वा, सौंदडच्या सदस्य रूपाली टेंभूर्णे यांनी गिरोला, सडक अर्जुनीचे सदस्य मिलन राऊत यांनी दल्ली गाव दत्तक घेतले.चिखलीचे सदस्य जागेश्वर धनभाते यांनी चिखली तर गोरेगाव तालुक्यातील गणखैराचे सदस्य मोरेश्वर कटरे यांनी सटवा, सोनीच्या सदस्य सिता रहांगडाले यांनी सिलेगाव, गिधाडीचे सदस्य विनोद अग्रवाल यांनी गिधाडी, गोरेगावच्या सदस्य बबीता टेंभुर्णीकर यांनी घोटी, कुऱ्हाडीचे सदस्य रामकिशोर राऊत यांनी बोळुंदा तसेच मोहाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कूसन घासले यांनी तेढा ही गावे दत्तक घेतली आहेत. (शहर प्रतिनिधी)