शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी पोलीस स्टेशनचा ‘पाऊल पडते पुढे’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावरून ठाणेदार संदीप इंगळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध  लावण्यासाठी  शासनाने घालून दिलेल्या  नियमांचे  काटेकोरपणे पालन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोना या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सतत मास्कचा वापर करण्यात यावा.

लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी  : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस विभागाने एक पाऊल पुढे टाकत येथील पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावरून ठाणेदार संदीप इंगळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध  लावण्यासाठी  शासनाने घालून दिलेल्या  नियमांचे  काटेकोरपणे पालन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोना या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सतत मास्कचा वापर करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घ्यावे. कोरोनाबाधित रुग्णांनी त्वरित आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे कोरोनासंदर्भातील विविध संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले.

नियमांचे करा काटेकोरपणे पालन - यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कोरोना या जागतिक महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा भयावह अनुभव घेतला आहे. केशोरीतील अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आता कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे. यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे सांगितले. ठाणेदार संदीप इंगळे यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोनासंदर्भातील निर्बंध पाळणे सर्वांना बंधनकारक आहे.

स्लोगन आणि बॅनर्समधून जनजागृती 

- नागरिकांनी कोरोनाचे नियम, निर्बंध पाळले नाही तर कडक निर्बंधास नागरिकांना सामोरे जावे लागेल. यापासून कोणीही सुटणार नाही आणि त्यासाठीच प्रामुख्याने कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोरोना जनजागृती रॅलीमध्ये पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. स्लोगन व बॅनर्सच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत कोरोना जनजागृती रॅलीचे विसर्जन पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आली.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या