ग्रामसेविकेची मनमानी : ग्राम खातिया येथील प्रकार रावणवाडी :तालुक्यातील ग्राम खातीया येथील ग्रामसेविका कुंदा मेंढे यांना माहितीच्या अधिकारांतर्गत पुरुषोत्तम डोंगरे यांनी ७ जानेवारी रोजी रितसर अर्ज करुन शौचालय बांधकामाबद्दल माहिती मागली होती. मात्र ग्रामसेविकांनी सदर माहिती काही मोठे कारण नसतानाही नाकारली. गावातील बी.पी.एल. लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाकरिता शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन ग्रामसेविक ा मेंढे यांनी लाभार्थ्यांना दिले. त्याबाबद प्रत्येक लाभार्थ्यांशी २० नोव्हेंबर २०१३ रोजी ५५० रुपयांचा भरणा ग्रामसेविकेने करवून घेतला. योजनेचे कार्यान्वयन २०१५ या वर्षात आले. त्यात बऱ्याच अपात्र लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ दिला गेला. मात्र पात्र लाभार्थ्यांनी ५५० रुपयांचा भरणा करुनही नऊ लाभार्थ्यांना योजनेपासून वंचीत ठेवण्यात आले. तर पंचायत समितीमधील बांधकाम अभियंत्यांच्या निर्णयाने आपणास वंचित करण्यात येत आहे असे पत्र मेंढे यांनी वंचितांना दिले आहे.या प्रकरणात नेमके काय काय घडले त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डोंगरे यांनी ७ जानेवारी रोजी रितसर अर्ज सादर करुन माहिती मागितली. मात्र ग्रामसेविका मेंढे यांनी बीपीएल- एपीएलचा उल्लेख अर्जात करण्यात आला नल्याचे कारण उपस्थित करुन माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. अर्जात बीपीएल किंवा एपीएलचे लिखान जरी आले नाही तरी अर्जदाराला पैशांचा भरणा करवून माहिती देता येत होती. मात्र अर्जदारांना टोलवाटोलवी करुन किरकोळ स्वरुपाचा मुद्दा उपस्थित करुन माहिती देण्यास नाकारणे हा माहिती अधिकार कायद्याचा उल्लघंन असल्याचे वंचित लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
माहिती अधिकाराला दाखविली केराची टोपली
By admin | Updated: February 12, 2016 02:12 IST