शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगाराची कास धरा

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर

अनिल सोले यांचा सल्ला : भाजयुमोचा रोजगार मार्गदर्शन मेळावागोंदिया : विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १२ जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त पवार बोर्डिंग येथे आयोजित रोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. मंचावर प्रामुख्याने खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, भाजप शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, जयंत शुक्ला, सविता इसरका, मुनाफ कुरेशी, डॉ. सुवर्णा हुबेकर, ऋशीकांत साहू, डॉ. लक्ष्मण भगत, दुर्गाप्रसाद नागभिरे, पंकज सोनवाने, शुक्राचार्य ठाकरे, तानाजी लंजे, देवचंद नागपूरे, विकास पटले, गुड्डू डोंगरवार, संदीप कापगते, निलेश दमाहे, मनोज दमाहे, राजेश शाह आदी उपस्थित होते.भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श जोपासत केंद्र व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाच्या विकासाकरीता युवाशक्तीचा वापर करुन भारताला जगापुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. रोजगाराभिमुख विकास हा राज्य व केंद्राचा प्रमुख कार्यक्रम आहे. आजघडीला रोजगाराच्या अपरिमित संधी निर्माण होत असून कौशल्यप्राप्त मुनष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे युवकांनी पुस्तकी ज्ञानासोबत स्वकौशल्य विकसीत करुन केवळ नोकरीच नव्हे तर उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आ.सोले म्हणाले. विदर्भातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी माहिती मिळावी, यासाठी नागपूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून युवकांना रोजगाराची दिशा मिळणार आहे. यावेळी खासदार पटोले यांनी, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक प्रकल्पांचा विचार सुरु असून त्याकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. लवकरच या माध्यमातून क्षेत्राचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, युवकांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून संधी निर्माण करुन देशाला पुढे नेले. आता पंतप्रधान मोदी देशातील युवकांच्या शक्ती व कौशल्यावर विश्वास ठेवून भारताला विश्वगुरु करण्याचे स्वप्न बघत आहेत. त्याकरीता युवकांनी परिश्रम करुन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले . दरम्यान आ. प्रा. सोले यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून युवकांना रोजगारा संदर्भात मार्गदर्शनपर चित्रफित दाखविली. यावेळी अनेक युवकांनी भाजयुमोमध्ये प्रवेश केला. संचालन मुकेश चन्ने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मांडले. आभार शुक्राचार्य ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी निकुंज साहू, रोहित अग्रवाल, निरज ठाकूर, छोटू भाटिया, छोटू रामटेककर, दिलीप पिल्ले, सतीश मेश्राम, बाबा बिसेन, संदीप पटले, शैलेश ढाले, विवेक भुंबर, रंजित नागपूरे, अनुराग शुक्ला, प्रसन्ना ठाकूर, राजेंद्र कावळे, गोल्डी गावंडे, गोल्डी मारवाहे, कनिराम तवाडे, योगेंद्र हरिणखेडे, कुणाल बिसेन, कमलेश सोनवाने, प्रकाश पटले, संजय जगने, ज्ञानचंद जमईवार, फणेंद्र पटले, कमलेश आतीलकर, कमलेश चुटे, कुशल अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदादिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)