शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:33 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशन : शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. शेतकऱ्यांना शेतीवर आधारित जोडधंदे उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कामधेनू प्रकल्पाच्या माध्यमातून २७ गावांमध्ये दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा उत्तम जोडधंदा आहे. गायी, म्हशी यांच्या मलमुत्रापासून शेतकऱ्यांना नि:शुल्क सेंद्रिय खत सुध्दा मिळते. शिवाय दुधाच्या विक्रीतून चारपैसे देखील मिळत असल्याने वर्षभर कुुंटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यास शेतकऱ्यांना मदत होवू शकते.जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या दीड लाखावर आहे. मात्र दुधाळू जनावरांना पौष्टीक आहार आणि त्यांच्या योग्य संगोपनाची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होतो. अदानी फाऊंडेशनने नेमकी हीच बाब हेरून तिरोडा तालुक्यातील २७ गावांची निवड करुन तिथे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे.या प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावातील दुधाळू जनावरांची नियमित तपासणी, कृत्रीम रेतन, प्रतिबंधात्मक लसीकरण व शेतकºयांना तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. अदानी फाऊंडेशन द्वारा राबविण्यात येणाऱ्या कामधेनू प्रकल्पांतर्गत कृत्रीम रेतनाद्वारे जन्मास आलेल्या नवजात गिर, साहीवाल, थारपारकर आणि मुर्रा जातीच्या वासरांना पाहुन शेतकºयांना गोपालनाची प्रेरणा मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा तसेच जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.प्रदर्शनीतून सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शनशेतीमध्ये रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमीन निकृष्ट होत चालली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होत सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे असून यामुळे खर्चाची सुध्दा बचत होते. सेंद्रिय शेती करण्याकरीता गांडूळ खत, दर्शपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र व अग्नीअस्त्र या कीड नियंत्रकांचा वापर करण्याचा सल्ला शेतकºयांना प्रदर्शनीचे आयोजन करुन फाऊंडेशन अंतर्गत दिला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcowगाय