शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड यात्रा २० पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 01:08 IST

आदिवासीचे उगमस्थान व श्रध्दास्थान असलेले पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव) ता. सालेकसा येथे कचारगड यात्रा ...

सालेकसा : आदिवासीचे उगमस्थान व श्रध्दास्थान असलेले पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव) ता. सालेकसा येथे कचारगड यात्रा येत्या २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती २४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या दरम्यान येथे पाच दिवस आदिवासी भाविकांची रीघ लागणार आहे. धनेगाव येथे विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद घ्यायला मिळणार आहे. यात बडादेव पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक प्रवचन दीक्षा समारोह, गोंडवाना महासंमेलन व इतर कार्यक्रमाची रेलचेल सुरू राहणार आहे. २० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपासून कोयापूनेम महोत्सवाची पार्श्वभूमी ठेवून यावर मार्गदर्शन करण्यात येईल. मार्गदर्शक म्हणून गोंडी धर्माचार्य प्रेमासिंह दादा सलाम राहणार असून दररोज त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम राहील. तसेच रात्रीला देशातील इतर राज्यातून आलेले वेगवेगळे आदिवासी कलावंत बांधवाच्या मुला-मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यात विविध पारंपरिक वाद्यसंगीत व गीतांचा, वेशभूषेचा समावेश असलेल्या गोंडी संस्कृतीचे दर्शन घडून येईल. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजे गोंड राजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्मध्वज फडकविण्यात येईल. त्यानंतर आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम यांच्या हस्ते गोंडवाना राज्य ध्वजारोहण करण्यात येईल. तसेच गोंडी धर्माचार्य व या यात्रेचे प्रेरणास्त्रोत स्व. मोतीराम कंगाली यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.याप्रसंगी गोंडवाना रत्न दादा हिरासिंह मरकाम कचारगड देवस्थानाचे संशोधक के.बा. मरस्कोल्हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. अतिथी म्हणून सरसेनापती शीतल मरकाम, चंद्रलेखा कंगाली, इतिहासकार भारत कोर्राम, गोंडी प्रचारक तेजराम मडावी, सोमेश्वर नेताम, माजी आ. मनमोहन शाह वट्टी, काशीनाथ कोकोडे, सुधाकर मडावी, मोहन सिडाम, संभाजी सलामे, मनोज इळपाते, हरिचंद सलाम आदी उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलन सुरू होईल. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा राहतील. उद्घाटन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. अतिथी म्हणून सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, कांकेरचे (छ.ग.) खा. विक्रम उसेंडी, आदिलाबादचे (आ.प्र.) खा. नागेश घोडाम, आर्णिचे आ. राजू तोडसाम, गडचिरोलीचे आ. देवराम होळी, मुख्य सचिव पी.एस. मीना, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, हनुवत वट्टी उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून स्थानिक आ. संजय पुराम व समिती अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे राहतील. २२ फेब्रुवारी रोजी कोया पूनेम महारॅलीचे आयोजन असून शुभारंभ शेरसिंह आचला यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर कोया पूनेम मांदी कार्यक्रम घेईल. अध्यक्षस्थानी गोंडी भूमकाल संघाचे अध्यक्ष मुठवापोय रावेन इनवाते राहतील. अतिथी म्हणून फेडरेशनचे पदाधिकारी मधुकर उईके, आर.डी. आत्राम, विजय कोकोडे, दिलीप मडावी, रमेश कुमरे, बी.एल. खंडाते, दुर्गावती सर्याम, ए.पी. प्रधान, प्रभा पेंदाम, मनोज नेताम, पर्वतसिंह कंगाली उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता कोया पूनेम महासंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय जनजाती कल्याण मंत्री ज्युएल ओशव यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गोंड महासभेचे अध्यक्ष एस.पी. सोरी राहतील. प्रमुख उपस्थिती कर्नाटकचे डॉ. मैत्री, आसामचे क्रिष्णा गोंड, पं.बंगालचे श्रीकांत गोंड, उत्तर प्रदेशचे शिवशंकर गोंड, मध्यप्रदेशचे माजी मंत्री देवसिंह सयाम, शंभू शक्ती, सेनेचे रघुवीर मार्को, वसंतलाल धुर्वा, जबलपुरचे सी.एस. उईके, आयुक्त डॉ. किशोर कुमेर उपस्थित राहतील. २३ फेब्रुवारीला गोंडवाना महासभा असून उद्घाटन माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या हस्ते, अध्यक्षस्थानी झारखंडचे आ. गुरूचरण नायक राहतील. अतिथी म्हणून नामदेव उसेंडी, आनंद गेडाम, दिपक आत्राम, रामरतन राऊत, दब्बूसिंह उईके, केशवराव मसराम, हिरामन उईके, भरत दूधनाग, सहेबराम कोरोटे, विजय टेकाम, जियालाल पंधरे राहतील. २४ फेब्रुवारीला समापन व बक्षीस वितरण होईल. पुरस्कार वितरण जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते, अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, अतिथी म्हणून सीईओ दिलीप गावडे, तहसीलदार प्रशांत सांगळे, सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, बीडीओ वाय.एम. मोटघरे, पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना उपस्थित राहतील. शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्थानी सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)