शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक  

By नरेश रहिले | Updated: November 22, 2023 19:18 IST

शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले.

गोंदिया: शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मामा चौकातील खडे हनुमान मंदिराजवळ, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) या शिक्षकाच्या घरून इंटरलॉक तोडून घरातून रोकड, मंगळसूत्र चोरी १६ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजता केली होती. या प्रकरणात आरोपी विकास बळीराम बुराडे ऊर्फ कालू (२५) रा. विजयनगर, मरारटोली, गोंदिया याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून ५० हजाराचा माल जप्त केला आहे.

शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले. घरातील बेडरूममध्ये असलेल्या आलमारीचे कुलूप तोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख २० हजार रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात बावनकुळे यांनी गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस हवालदार लुटे, पोलिस शिपाई रहांगडाले, चालक पोलिस शिपाई पांडे, कुंभलवार यांनी यांनी केली आहे. घरात लपविले चोरी केलेले साहित्यआरोपी विकास बळीराम बुराडे ऊर्फ कालू (२५) रा. विजयनगर, मरारटोली, गोंदिया याने चोरी केलेले साहित्य हे आरोपीने आपल्या घरी लपवून ठेवले होते. त्याच्या घरून मंगळसूत्र १ तोळा वजनाचा किंमत ४० हजार, ५०० रूपयाच्या ४ नोटा किंमत २००० हजार, २०० रूपयांच्या ८ नोटा किंमत १ हजार ६०० रूपये, १०० रूपयाच्या ७० नोटा किंमत ७ हजार रुपये रोख असा एकूण ५० हजार ६०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाArrestअटक