गोंदिया : रेल्वे विभागाने गोंदियाला हटियाकरीता ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ ही त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी भेट दिली आहे. या गाडीचा शुभारंभ २६ आॅक्टोबर रोजी होत आहे. गोंदिया-हटियादरम्यान धावणाऱ्या या गाडीचा क्रमांक ०८८९३ राहणार असून ही गाडी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सकाळी ६.३० वाजता सुटणार आहे. रात्री ९.१५ वाजता ती हटिया रेल्वे स्थानकावर पोहचेल. तसेच हटिया रेल्वे स्टेशनवरून ही गाडी ०८८९४ क्रमांकाने दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता रवाना होणार असून रात्री ८.२० वाजता गोंदिया स्थानकावर पोहचेल. ही त्रिसाप्ताहिक गाडी गोंदियाहून मंगळवार, शुक्रवार व रविवारी धावेल. तसेच हटियावरून गोंदियाकरीता बुधवार, शनिवार व सोमवारी परतीचा प्रवास करणार आहे. या गाडीत एकूण १८ डब्यांची व्यवस्था रेल्वे विभागाने केली आहे.(शहर प्रतिनिधी)
आजपासून सुरू होणार जनशताब्दी एक्स्प्रेस
By admin | Updated: October 25, 2014 22:42 IST