शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

जय श्रीराम व जय झुलेलालचा गजराने दुमदुमले शहर

By admin | Updated: March 22, 2015 00:53 IST

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने आणि सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल ...

गोंदिया : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने आणि सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेने शनिवारी गोंदिया शहर दुमदुमून गेले. जय श्रीराम आणि जय झुलेलालचा गजर करीत या शोभायात्रेने गोंदियावासीयांचे लक्ष वेधून घेतले.येथील सिव्हील लाईन्स, हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची तर सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती. मराठी नववर्षाला शनिवारपासून (दि.२१) प्रारंभ झाला. चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरूवात झाली. गुढीपाडवा ते रामनवमी या काळासाठी गोंदियात श्रीरामाच्या मूर्तीची वाजतगाजत येऊन स्थापना केली जाते. शहरातील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चना केली जाते. त्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात शोभायात्रा काढली जाते. यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस व नववर्ष असल्याने सिंधी समाजाचीही शहरात शोभायात्रा निघाली होती. हजारोंच्या संख्येत सिंधी बांधव त्यात सहभागी झाले होते. या शोभायात्रेतील आकर्षक देखाव्यांनी मन मोहून घेतले. सिंधी कॉलनीतून ढोलताशांच्या गजरात नाचत गात निघालेली ही शोभायात्रा मुख्य मार्गाने फिरली. (शहर प्रतिनिधी)बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाही येथील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.नऊ दिवसांसाठी स्थापना करण्यात आलेल्या या मुर्तीची विधिवत पूजन केले जाते. शहरात सिंधी समाजबांधवांची मोठी संख्या असून त्यांच्या आद्य दैवतांचा जयंती दिवस असल्याने शोभायात्रेत सहभागी बांधवांसाठी शहरातील चौकाचौकांत चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच पेय शोभायात्रेतील बांधवांना देताना सिंधी समाजबांधव दिसून आले. बाजारपेठेतील सुमारे ७० टक्के सिंधी समाजातील व्यापारी आहेत. आज झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी नवयुवक सेवा मंडळाकडून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील समस्त सिंधी बांधवांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.