शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

प्लास्टिक उद्योगाचा मुद्दा विधानसभेत उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:20 IST

प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देअग्रवाल यांचा पुढाकार : उपाययोजनेसाठी तीन सदस्यीय समिती बनविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले. त्याबद्दल जिल्ह्यातील प्लास्टिक उत्पादन तसेच व्यायसायिकांच्या प्रतिनिधी मंडळाने आ.अग्रवाल यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टिक झिल्ली-पॅकेट, डिस्पोजेबल वस्तू, फॅक्स बोर्ड यासह सर्व प्रकारच्या प्लास्टिक वस्तू, प्लास्टिक वस्तूंचे निर्माण व उपयोगावर बंदी घातली होती. त्यामुळे प्लास्टिक उद्योगात कार्यरत कामगार, कारखानदार व व्यवसाय करणारे २० लाखांपेक्षा अधिक लोक राज्यात बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला. या संदर्भात जिल्ह्यातील प्लास्टिक व्यावसायिकांनी आ. अग्रवाल यांची भेट घेवून त्यांना या निर्णयाची माहिती दिली व सदर निर्णय रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली.आ. अग्रवाल यांनी या मुद्यावर विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले. एकीकडे शासन मॅग्नेटिक महाराष्टÑ योजनेंतर्गत मोठमोठे उद्योग राज्यात आणण्याचे आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे नवनवीन नियम लावून स्थापित उद्योगांना बंद करीत आहे. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार होत आहेत. प्लास्टिक उद्यागोशी २० लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जुळले आहेत. राज्यात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी लागली तर २० लाखांपेक्षा अधिक लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल. प्लास्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या लोकांचा विचार करणे आवश्यक आहे. या बंदीमुळे ग्राहकांना होणाऱ्या त्रासापोटी आधी पर्यायी व्यवस्था बंदीपूर्वी शासनाने करणे गरजेचे होते. शासनाने प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणावी, परंतु आधी या उद्योगाशी निगडीत लोकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी. तसेच ग्राहकांच्या त्रासासाठीसुद्धा पर्यायी व्यवस्था करावी व नंतरच प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आणावी, असे सांगितले.त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लास्टिक उत्पादनांवरील बंदी शासन परत घेणार नाही. परंतु आ. अग्रवाल यांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेईल. प्लास्टिक झिल्लींवर बंदीमुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांना अडचणी येत आहेत. उद्योगाशी निगडीत लोकांवरही बेरोजगारीचे सावट पसरले आहे. या सर्वांसाठी पर्यायी व्यवस्था-उपाययोजना करण्यासाठी विधान मंडळाची उपसमिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्लास्टिक व्यावसायिक व उत्पादकांना दिलासा देण्यासाठी येणाºया तीन महिन्यांपर्यंत प्लास्टिक बंदी कायदा कठोरतेने लागू करण्यात येणार नाही. तसेच नागरिकांनाही प्लास्टिक बंदीसाठी काही कालावधी देण्यात येईल.या वेळी शिष्टमंडळात संतोष मुंदडा, विपूल पलन, संतोष फगवानी, विवेक असाटी, नरसिंग अग्रवाल, ओमप्रकाश पोरवाल, नितीश अग्रवाल, ओमप्रकार हंसपाल, शैलेश असाटी, दीपक चौरसिया, हरीश अडवानी, संजय खटवानी, अर्जुन नागवानी, पंकज वाधवानी, विजय शर्मा, जयकिशन मुंदडा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल