शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आॅगस्ट महिन्यात सिंचन प्रकल्प अर्धेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:28 IST

मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतकऱ्यांची भिस्त, पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर शेतकऱ्यांचे बरेच गणित अवलंबून असते. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथील तलावात केवळ ३.१३ टक्के, कोसबी बकी येथे ३.०४ टक्के पाणीसाठा आहे. स्थानीक स्तरच्या तलावांमध्ये सालेगाव ६.०३ टक्के व चारभाटा ६.४८ टक्के पाणीसाठा आहे. गिरोला तलावात १५.९२, चिरचाडी १३.५९, कोसमतोंडी १६.५०, खाडीपार १०.०६, मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा जलाशयात १८.३०, लघू प्रकल्पातील भदभद्या तलावात ३२.४६, रिसाला १०.२३, सालेगाव २१.८६, शेरेपार तलावात २९.७२, नवेगावबांध ३६.६७, तर ओवारा तलावात २५.९९ टक्के पाणीसाठा आहे. बोदलकसा जलाशयात ७७.३२, चुलबंद ५१.२७, खैरबंदा ५७.०९, मानागड ७७.८३, रेंगेपार ५४.५३, संग्रामपूर ९०.५३, कलपाथरी ५७.९५, आक्टीटोला ६८.१३, गुमडोह ६८.६७,कालीमाटी ६८.३०, मोगर्रा ६०.३२, पिपरीया ५७.९०, पांगडी ५६.२१, बडेगाव ८१.६६, जुनेवानी ६२.४४, बेवारटोला ८७.२०, भिवखिडकी ७५.१५, चान्ना-बाक्टी ८०.१५, धाबेटेकडी ६५.६५, गोठणगाव ५३.४४, कवठा ७०.४५, खैरी ८५.१६, खमारी ७९.३०, पळसगाव ५६.२२, पालडोंगरी ८१.६९, पळसगाव (डव्वा) ५९.९१, पुतळी ९८.५९, सौंदड ७५.११, तेढा ६९.११, ताडगाव ५६.५८ व छत्तरटोला तलावात ९३.२९ टक्के पाणीसाठा आहे. या तलावात सध्या तरी समाधानकारक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, ज्या तलावांत पाणीसाठा कमी आहे ते तलाव सिंचनासाठी महत्वपूर्ण आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक स्थितीमध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची जिल्ह्यातील संख्या ६९ आहे. यात एकूण ५३.३१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांची स्थिती उत्तम आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत या तलावांत फक्त १७.७५ टक्के पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पांच्या नऊ जलाशयांत ५८.३१ टक्के पाणी असून मागील वर्षी फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा होता. लघू प्रकल्पातील २० तलावांत ४४.७४ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.२८ टक्के पाणीसाठा होता. तर जुन्या मालगुजारी ३८ तलवांत यंदा ५६.५९ पाणीसाठा आहे तर मागील वर्षी फक्त २२.१५ टक्के पाणीसाठा होता.१० तलावात शंभर टक्केजिल्ह्यातील काही तलाव व जलाशय अद्याप तहानलेले असतानाच काही तलाव शंभर टक्के भरले आहेत.यात कटंगी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, भानपूर, फुलचूर, गंगाझरी, मेंढा, मोरगाव व माहुरकुडा या तलावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस