शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

१३८९४ हेक्टरला सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळे अद्याप येथील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा ...

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळे अद्याप येथील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा आहे. हे बघता यंदा पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात रबीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून यंदा १३८९४ हेक्टरसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यात उन्हा‌ळ्याची सोय करून ठेवल्यानंतरही पाणी शिल्लक राहणार एवढा साठा दिसून येत आहे. याकडे लक्ष देत यंदा जिल्ह्यात रबीसाठी सिंचनाची सोय करण्याचे ठरले आहे. यासाठी नुकतीच कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात रबीसाठी सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदा जिल्ह्यातील १३८९४ हेक्टरला सिंचन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाद्वारे ९९३४ हेक्टरचे तर बाघ प्रकल्पातून (पुजारीटोला) ३९६० म्हणजेच एकूण १३८९४ हेक्टरचे सिंचन केले जाणार आहे. रबीसाठी सिंचनाची सोय होणार असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही फुलणार आहे. विशेष म्हणजे, यांतर्गत आता पाण्याची ३ री पाळी सुरू आहे.

-------------------------------------

असे करण्यात आले आहे नियोजन

सिंचनासाठी करण्यात आलेल्या नियोजनांतर्गत, इटियाडोह प्रकल्पातून ९९३४ हेक्टरचे नियोजन असून यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ टक्के म्हणजेच ३४७७ हेक्टर, लखांदूर (भंडारा) तालुक्यातील २५ टक्के म्हणजेच २४८३ हेक्टर तर वडसा व आरमोरी (गडचिरोली) तालुक्यातील ४० टक्के म्हणजेच ३९७४ हेक्टरचा समावेश आहे. तसेच बाघ प्रकल्पातून ३९६० हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच १९८० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३० टक्के म्हणजेच ११८८ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २० टक्के म्हणजेच ७९२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.