शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

१३८९४ हेक्टरला सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देरबीचा हंगाम फुलणार : ३ री पाळी झाली सुरू

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळे अद्याप येथील प्रकल्पांत भक्कम पाणीसाठा आहे. हे बघता यंदा पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात रबीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून यंदा १३८९४ हेक्टरसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती आजही वरथेंबी आहे. अशात चांगला पाऊस पडल्यास खरिपाचा हंगाम चांगला निघून जातो. शिवाय रबीसाठीही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय पाटबंधारे विभागाकडून करून दिली जाते. अन्यथा खरिपात शेती करायची व रबीत बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी कोणतेही पीक घेता येत नाही. मात्र, मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने आजही प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यात उन्हा‌ळ्याची सोय करून ठेवल्यानंतरही पाणी शिल्लक राहणार एवढा साठा दिसून येत आहे. याकडे लक्ष देत यंदा जिल्ह्यात रबीसाठी सिंचनाची सोय करण्याचे ठरले आहे. यासाठी नुकतीच कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात रबीसाठी सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदा जिल्ह्यातील १३८९४ हेक्टरला सिंचन केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाद्वारे ९९३४ हेक्टरचे तर बाघ प्रकल्पातून (पुजारीटोला) ३९६० म्हणजेच एकूण १३८९४ हेक्टरचे सिंचन केले जाणार आहे. रबीसाठी सिंचनाची सोय होणार असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही फुलणार आहे. विशेष म्हणजे, यांतर्गत आता पाण्याची ३ री पाळी सुरू आहे. 

असे करण्यात आले आहे नियोजन सिंचनासाठी करण्यात आलेल्या नियोजनांतर्गत, इटियाडोह प्रकल्पातून ९९३४ हेक्टरचे नियोजन असून यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ टक्के म्हणजेच ३४७७ हेक्टर, लखांदूर (भंडारा) तालुक्यातील २५ टक्के म्हणजेच २४८३ हेक्टर तर वडसा व आरमोरी (गडचिरोली)  तालुक्यातील ४० टक्के म्हणजेच ३९७४ हेक्टरचा समावेश आहे. तसेच बाघ प्रकल्पातून ३९६० हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ५० टक्के म्हणजेच १९८० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३० टक्के म्हणजेच ११८८ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २० टक्के म्हणजेच ७९२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प