शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

सागवान तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

सालेकसा : सहायक वन व्यवस्थापन समिती नवाटोला (हाजराफॉल) व वनविभाग सालेकसा यांच्या संयुक्त गस्तीच्या वेळी मध्य प्रदेशातील सागवान तस्करांच्या ...

सालेकसा : सहायक वन व्यवस्थापन समिती नवाटोला (हाजराफॉल) व वनविभाग सालेकसा यांच्या संयुक्त गस्तीच्या वेळी मध्य प्रदेशातील सागवान तस्करांच्या टोळीला शासकीय वनातून अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी ए.व्ही. इलमकर, स.व.व्य. समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे व सालेकसाचे क्षेत्र साहाय्यक एम.एम. गजभिये यांची विशेष चमू तयार केली. ही चमू नवाटोला परिसरात रात्री गस्तीवर असताना त्यांना दरेकसा घाटाजवळ कक्ष क्रमांक ८१८ अवर्गीकृत वनामध्ये हात आऱ्याचा आवाज आला. या आवाजाच्या दिशेने गेल्यावर त्यांना आरोपी जगन प्रताप वसोने, जोहन प्रताप वसोने, पुनाराम तेजलाल लिल्हारे यांच्यामध्ये चकमक झाली. तर नीलेश उपराडे, प्रमोद (सर्व रा. टेकेपार, ता. लांजी, जि. बालाघाट) (मध्य प्रदेश रहिवासी) हात आऱ्याच्या साहाय्याने सागवान लाकूड कापताना आढळले. या तस्करांच्या टोळीशी वनकर्मचारी व समिती सदस्य यांची चकमक झाली. या चकमकीमध्ये आरोपी क्र. १ ते ३ यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले व आरोपी क्र. ४ व ५ फरार झाले. आरोपींच्या नावे वन गुन्हा ०४१९१/१०४७३१/२०२१ जारी करण्यात आला. आरोपींकडून हातआरा, कुऱ्हाड, रस्सी व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४७१९१ रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले.

................

मध्य प्रदेश वन विभागदेखील होता या टोळीच्या शोधात

२१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना प्रथम दंडाधिकारी न्यायालय, आमगाव यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवस वन कोठडीमध्ये पुढील तपासाकरिता ठेवले आहे. ही टोळी मध्य प्रदेशातदेखील सक्रिय असून त्यांच्याविरुद्ध म.प्र. वनविभागात वन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेदेखील या टोळीच्या शोधात होते. हाजराफॉल पर्यटनस्थळी कार्यरत असलेल्या नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आरोपींना पकडण्यात वन विभागाला सहकार्य केले.