गुन्हे शाखेची कारवाई : सहा जणांना घेतले ताब्यातगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बँकेमधून दैनंदिन व्यवहार करणारे व्यापारी तसेच सामान्य जनता यांच्यासोबत दररोज होणाऱ्या बॅग लिफ्टिंगच्या घटना मागील काही दिवसांपासून गोंदिया शहर, रामनगर भागात वाढत आहेत. त्यावर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने या बॅग लिफ्टींग करणाऱ्या चमूचा पर्दाफास केला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे.बॅग लिफ्टींग करणाऱ्या आरोपींंना पकडण्यासाठी विशेष मार्गदर्शन पोलिसांना करण्यात आले. बँकेच्या बाहेर उभे राहून कटाक्ष पाळत अशा बॅग लिफ्ट करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसावा या करीता आदेश देण्यात आले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी आपले अधिनस्त चमूला मागील दोन-तीन आठवड्यापासून आळीपाळीने शहरातील प्रत्येक बँकासमोर टेहाळणी करण्याकरीता कामास लावल्याने गुरूवारी बँक लिफ्टिंग करणाऱ्या आंतराष्ट्रीय सक्रीय टोळीतील सहा गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले. बुधवारी नेहमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील चमू गोंदिया शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया समोर संशयीत इसमांवर पाळत ठेवून असताना बँकेचा एक ग्राहक आपली रोख रक्कम घेवून बँकेबाहेर येत असताना सदर ग्राहकाच्या मागे एक संशयीत इसम पायी पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. वरिष्ठांना याबाबत माहिती देवून बॅग लिफ्टिंग करणारे गुन्हेगार शहरात दाखल झालेले आहेत, अशी माहिती दिली. तत्काळ अतिरिक्त कुमक मागवून गुन्हेगारांना पकडण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक, डॉ. संदीप पखाले यांच्या सुचनेवरुन पोलीस निरीक्षक देशमुख, शुक्ला व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, वर्गे, सहाय्यक फौजदार सुधीर नवखरे, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, संतोष काळे, नायक पोलीस शिपाई उजय सव्वालाखे, जयप्रकाश शहारे, धनंजय शेंडे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, अशोक कापसे, हरीष बुंदेले, अनील चक्रे, स्टीफन महिला पोलीस शिपाई सरीता बघेले, स्मीता टोंडरे चालक पोलीस हवालदार सूर्यप्रकाश सयाम, गायधने यांनी केली.असा केला आरोपींचा पाठलागआरोपींमध्ये पवली शाम बानाला (३१), प्रभूदास सुधाकर मॅकला वय (२६) रा. मेट्रोगुंटा टिप्पा, ता. कावीळ जि. नेल्लुर (आंध्रप्रदेश) यांना संशयास्पद स्थितीत स्टेट बँक आॅफ इंडिया, गोंदिया येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या साथीदारासह गोंदिया शहर पोलीस घाण्यात एक गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांना अटक झाल्याचे पाहून त्याचे साथिदार पळून गेले. पोलिसांनी नाकाबंदी करून चांडी संपतकुमार पेटला (१८), अरुणबाबु रुड्डा (२०) रा.मेट्रोगुंटा टिप्पा, ता.कावीळ जि. नेल्लुर यांना चंद्रभागा नाका तिरोडा येथून पकडण्यात आले. या टोळीतील आणखी सदस्य भंडारा जिल्हा परीसरात असल्याची माहिती मिळताच त्या दिशेने आगेकुच करण्यात आली. सापळा रचून शिताफीने आरदासू बाबू रुढ्ढा (२४), अनुककुमार कोटेशराव तुपाकला (२४) रा.मेट्रोगुंटा टिप्पा ता. कावील जि. नेल्लुर (आंध्रप्रदेश) यांना वरठी रेल्वे स्टेशन, भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले.
आंतराज्यीय टोळीस अटक
By admin | Updated: August 14, 2015 02:03 IST