‘तू जसा आहेत तसा छान आहेस’ हे विद्यार्थ्यांत रूजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:14 PM2021-01-29T13:14:09+5:302021-01-29T13:14:45+5:30

Gondia News विद्यार्थ्याकडे जे आहे ते चांगले आहे आणि तुझ्याकडे जे चांगलं आहे त्यात तूू उत्तम हो. ‘तू जसा आहेस तसा छान आहेस’ हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवे, असा संदेश साहित्यिक व कवयित्री तसेच सांगली येथील केंद्र मुख्याध्यापिका डॉ. स्वाती शिंदे यांनी दिला.

Instill in the students ‘You are as good as you are’ | ‘तू जसा आहेत तसा छान आहेस’ हे विद्यार्थ्यांत रूजवा

‘तू जसा आहेत तसा छान आहेस’ हे विद्यार्थ्यांत रूजवा

Next
ठळक मुद्देजिल्हा शिक्षक भगिनी मंडळाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : सावित्री, अहिल्या व जिजाऊंचा वारसा घेऊन स्त्री जन्माला आलेल्या नारी शक्तीने गर्दीत ताठ मानेने जगायला शिकावे. विद्यार्थ्याकडे जे आहे ते चांगले आहे आणि तुझ्याकडे जे चांगलं आहे त्यात तूू उत्तम हो. ‘तू जसा आहेस तसा छान आहेस’ हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवे, असा संदेश साहित्यिक व कवयित्री तसेच सांगली येथील केंद्र मुख्याध्यापिका डॉ. स्वाती शिंदे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा शिक्षक भगिनी मंडळाच्या सहकार्याने शहरातील मरराटोली परिसरातील नारायण लॉन येथे शिक्षक भगिनी मेळावा तसेच हळदी-कुंकू व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. शिंदे बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, अनिरुध्द मेश्राम, उमाशंकर पारधी, शंकर नागपुरे, हेमंत नागपुरे, हेमंत पटले, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, शंकर चव्हाण, विजय डोये, वरुन दीप, ओमेश्वरी बिसेन, सुमेधा गजभिजे, शीला चव्हाण उपस्थित होते. यावेळी डॉ. शिंदे यांनी नारी शक्तीचा जागर केला व महिला शिक्षिकांनी आपल्या पेशातील बाईपण सोडून आईपण अंगी बाळगावे. विद्यार्थ्याला घडविण्याचे कार्य आईच्या मायेतून करावे, असे सांगितले. ‘नाद नाही करायचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वाघिणींचा’ हा नारा त्यांनी उपस्थित नारी शक्तीला देऊन आपल्या ओजस्वी मार्गदर्शनातून सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

 

Web Title: Instill in the students ‘You are as good as you are’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.