शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देहाती आलेले पीक गमाविण्याची वेळ : चार हजार हेक्टरमधील पिके बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ढगाळ व उष्ण दमट वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील धान पिकांवर होत आहे. वातावरणातील बदलामुळे ४ हजार हेक्टरमधील धान पिकांवर करपा, मानमोडी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिके गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.परिणामी धानावर खोडकिडा, पेरवा, मानमोडी, पर्णकोस, करपा, लोंबीवरील ढेकण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत असून शेतकºयांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या मते बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धान पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ आणि उष्णदमट वातावरण बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी अनुकुल असते. त्यामुळे सध्या बुरशीेजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत आहे. ४० हजार हेक्टरपैकी जवळपास ४ हजार हेक्टरमध्ये या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या धान निसविण्याच्या स्थितीत आहे याच कालावधी करपा, मानमोडी, पेरवा, खोडकिडा या किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकºयांना हाती आलेले पीक गमवावे तर लागणार नाही ना अशी चिंता सतावित आहेत. धानावरील किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र यानंतरही किडरोग आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव परिसराला फटकारब्बी हंगामातील धानाची सर्वाधिक लागवड ही अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आली आहे. मात्र या भागातील धान उत्पादक शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून चिंतातूर आहे. ऐन धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना हाती आलेली पीक गमाविण्याची वेळ आली आहे. किटकनाशकांची फवारणी करुन सुध्दा किडरोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी सुध्दा यामुळे त्रस्त झाले आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.या धानावर कमी प्रादुर्भावइतर धानाच्या प्रजातींच्या तुलनेत सुमो,बाहुबली, १००१ या धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकºयांनी अहिल्या प्रजातीच्या धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. त्यापासून चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकºयांनी यंदा देखील मोठ्या प्रमाणावर याच धानाची लावगड केली.मात्र सध्या या धानावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे शेतकºयांनी धानपिकावरील रोगाला सुध्दा सध्या कोरोना हे नाव दिल्याची माहिती आहे.ढगाळ आणि उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टरमधील पिके किडरोगामुळे बाधीत झाली आहे. किडरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार आणि कृषी अधिकाºयांना सुध्दा आहे. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती