शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

अर्जुनी मोरगाव : 'अच्छे दिन आएंगे'चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. अच्छे दिन तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम ...

अर्जुनी मोरगाव : 'अच्छे दिन आएंगे'चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. अच्छे दिन तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू शकले नाहीत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई अशा दुष्टचक्रात जनता अडकली आहे. वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने लगाम लावावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या दरात दैनंदिन वाढ होत आहे. तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरचे दर गेल्या एक महिन्यात सुमारे दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर त्या प्रमाणात किमती कमी होत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले. या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा विचार सरकारने केला पाहिजे, असे मत परशुरामकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफकोने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमती ५८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यातील शेतकरी डीएपीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रब्बी हंगामात अडीच लाख टन तर खरीपमध्ये सहा लाख टनांपर्यंत डीएपीची विक्री होते. १२०० रुपयात मिळणारे डीएपी १९०० रुपयात मिळणार आहे. १०:२६:२६ हे खत ११७५ रुपयात मिळत होते. ते आता १७७५ रुपयात मिळणार आहे. तर १२:३२:१६ हे खत ११८५ रुपयाला मिळत होते ते आता १८०० रुपयाला मिळणार आहे. या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारने याचा विचार करून दरवाढीवर नियंत्रण राखावे अन्यथा शेतकऱ्यांना जगणे दुष्कर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.