शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:28 IST

मागील दहा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा शनिवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ग्रामीण भागात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र शनिवारी चार कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात मुंबई, पुणे आणि इतर राज्यातील लोकांचे येणे सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेरुन जिल्ह्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ६६ वर पोहचला आहे. मात्र शुक्रवारपर्यंत २८ आणि शनिवारी पुन्हा चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यात आता ३४ अक्टीव्ह रुग्ण आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णामध्ये १ देवरी तालुक्यातील तर ३ गोंदिया तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांपासून देवरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे हा तालुका आत्तापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र शनिवारी देवरी तालुक्यात सुध्दा १ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे.

३२ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्तजिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र यापैकी शनिवारपर्यंत (दि.३०) एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३४ अक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून ते सुध्दा उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माहिती लपविणाऱ्यांमुळे वाढला धोकामुंबई, पुणे, दिल्ली या मोठ्या शहरांसह बाहेरील राज्यात रोजगार व इतर कामासाठी गेलेले नागरिक आता आपल्या जिल्ह्यात परतत आहे. मात्र हे जिल्ह्यात परतल्यानंतर याची माहिती जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला देत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. बाहेरुन येणारे नागरिक माहिती लपवित असल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत सुध्दा भर पडली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस