शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

पुन्हा लॉकडाऊनचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

तिरोडा नगर परिषदेने लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर गांर्भियाने विचार करित पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात तिरोडा आणि गोंदियाचा समावेश : रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील १५ दिवसांपासून तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. तिरोडा नगर परिषदेने लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर गांर्भियाने विचार करित पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. बुधवारपासून (दि.१५) या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिले आहे.दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात २५ जूनला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधित रुग्णांचे व्दिशतक पूर्ण झाले आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात आढळले आहे. तर तिरोडा तालुक्यात आणि स्थानिकांमध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आतापर्यंत ७-८ कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे.विदेशातून परतणाºया नागरिकांमध्ये सर्वाधिक तिरोडा तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. याच तालुक्यातील अद्यापही ५० हून अधिक जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. सोमवारी (दि.१३) आढळलेल्या एकूण ७ कोरोना बाधित रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील ४ आणि गोंदिया तालुक्यातील १ व गोरेगाव तालुक्यातील ग्राम भडंगा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तिरोडा व गोंदिया तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. याच पार्श्वभुमीवर तिरोडा नगर परिषदेने शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात यावा, यासंबंधिचा प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया येथे सुद्धा लॉकडाऊन करण्याच्या विचारात प्रशासन आहे.सोमवारी सायंकाळी यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचे मंथन सुरू होते. दरम्यान मंगळवारी (दि.१४) यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या २ तालुक्यांत लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.नागरिकांनो नियमांचे काटेकोरपणे करा पालनकोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करणे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असे निर्देश असताना सुद्धा त्याचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. परिणामी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविणारजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिजोखमीच्या रुग्णांची अधिक काळजी घेतली जात आहे. त्यातच आता स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोना वाढता संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विषयक उपाययोजना राबविण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडल्याची माहिती आहे.कडक लॉकडाऊन नकोचमार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे जवळपास ३ महिने सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्याने सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा थोडे उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये असा सूर व्यापाऱ्यांमध्ये आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या