शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार

By admin | Updated: March 13, 2016 02:08 IST

मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

पालकमंत्री बडोले : ३३ के.व्ही.च्या कोहमारा उपकेंद्राचे उद्घाटन गोंदिया : मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कृषी पंप जोडणीमुळे शेतकरी आता बारमाही शेतीकडे वळत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी आता फिडर सेपरेशनचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा (कोसबी) येथे राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, महावितरणच्या गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर, अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, ए.एस.घोगरे, भंडाराचे अधीक्षक अभियंता मडावी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सडक/अर्जुनीचे उपविभागीय अभियंता दखने, विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, कोसबी सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच कृष्णा कोरे, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याचा रेकार्ड केला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी कमी होत आहेत. त्यात आता खोबा, कोसमतोंडी व केशारी येथे लवकरच नवीन उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येईल. क्षेत्रनिहाय वीज पुरवठा ग्राहकांना व्यवस्थितपणे देणे हे कंपनीचे काम आहे. शेंडा व दल्ली परिसरातील शेतक री व ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी बिल देण्यात येत असल्याच्या तक्र ारी आहेत तरी मीटर रिडींगनुसार बिल देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच मागास व दुर्गम क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी इन्फ्रा-२ चे योग्य नियोजन करावे. राज्यातील दलित वस्त्यांना योग्यप्रकारे वीज पुरवठा व्हावा, तसेच वीज उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४०० ते ५०० कोटी रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांनीसुध्दा वीज बिलाचा भरणा त्वरीत करु न वीज कंपनीला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रंगारी यांनी, कोहमारा येथे नव्याने तयार झालेल्या उपकेंद्रामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या व घरगुती वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष द्यावे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जनवीर यांनी, २ कोटी ५० लक्ष रु पये खर्च करु न तयार करण्यात आलेल्या कोहमाराच्या या उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांना लाभ होणार आहे. विकासकामे करताना कंपनीला वीज ग्राहकांनी सहकार्य केल्यास समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. संचालन उपअभियंता परिहार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोहमारा परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)