शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणी साठवण क्षमता वाढणार

By admin | Updated: January 15, 2015 22:53 IST

‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार

दिलीप चव्हाण - गोरेगाव‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार काम सुरू झाले असून त्याचे चांगले परिणाम येत्या काही वर्षात दिसतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. सुविधांचा विचार करुन मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण-प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, विषय, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्षाने विकासामध्ये आव्हान ठरत आहेत. मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमतरता हा घटक कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्धता करुन देण्यासाठी ग्रामविकास व जलंसधारण विभागाने कंबर कसली आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण कसे राहील याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. भूगर्भातील पाणी पातळीत मोठी घट झालेले राज्यभर १८८ तालुके म्हणजे २२३४ गावे आहेत. या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. शासनाने दि. २५ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. अनेक जलाशयांमध्ये यावर्षी पाणीसाठाही घटला आहे. ही वास्तविकता पाहता जलयुक्त शिवार अभियान राबविणे किती गरजेचे झाले याची कल्पना येते.या अभियानातून पाणी अडविणे/जिरविण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनाचे पुनर्जिविकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे इत्यादी शासनाचे उद्देश आहेत.