शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले ...

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे बाजारपेठेत जास्तच त्रास असून वाहतूक विस्कळीत होते. ही जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धान पिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी, सिंदिपार, सलाईटोला, मुशानझोरवा या गावांत टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

स्मशान शेड केव्हा तयार करणार ?

मुंडीकोटा : नवेगाव (खुर्द) येथे बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे शेड उभारण्याची मागणी होत आहे.

कलावंतांना मानधनास आताही विलंबच

गोंदिया : ५० वर्षे वय झाले की, शासनाकडून वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ कलाकाराला मिळतो, पण गेल्या काही महिन्यांपासून समाजकल्याण समिती गठित नसल्याने मानधनास विलंब होत आहे.

कचरापेट्या कचऱ्याने बरबटलेल्या

नवेगावबांध : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, त्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या बरबटलेल्या आहेत.

योग्य लाभार्थी घरकुलापासून वंचित

मुंडीकोटा : घोगरा परिसरात घरकुलांचा लाभ मिळावा, असे अनेक गरजू अजूनही प्रतीक्षेत आहेत. घर कोसळण्याच्या अवस्थेत असूनही ते लाभापासून वंचित आहेत.

बोदलकसा-बिर्सी फाटा रस्ता अर्धवट

सुकडी- डाकराम : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील रस्त्याचे काम ३ वर्षांपासून अर्धवट असल्याने रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही या रस्त्याकडे प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप परिसरातील जनता करीत आहे. तिरोडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बोदलकसा ते बिर्सी फाटा या मुख्य रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम ३ वर्षांपासून सुरू आहे; पण हा ९-१० किमी. अंतराचा रस्ता अजूनपर्यंत अर्धवट आहे.

रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ

सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.