शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारु विक्रेत्यांवर आवळला फास

By admin | Updated: April 3, 2017 01:33 IST

जिल्हा पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध फास आवळला असून १ एप्रिल रोजी धाड सत्र राबविले.

गोंदिया : जिल्हा पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध फास आवळला असून १ एप्रिल रोजी धाड सत्र राबविले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व मोहफुलाची दारू जप्त केली आहे. यात, ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत अदासी तांडा येथील संतोष देवीसिंह बैस (३८) कडून देशी दारुचे पव्वे ९६ , फुलचूरटोला येथील प्रमिला चचाणे (३५) कडून सहा लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी गोंडमोहाडी येथील रमेश राऊत (६२) कडून सात लिटर मोहफुलाची दारु, महालगाव येथील यशवंत नागपुरे (६२) कडून १० लिटर हाभ. दारु, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सोनेगाव येथील विनय पारधी (३६) कडून देशी दारुचे नऊ पव्वे, बरबसपुरा येथील जाराम बुरे (४३) कडून पाच लिटर हाभ. दारु, बोरा येथील रत्नाकर डोंगरे कडून पाच लिटर हाभ.दारु, धामनेवाडा येथील खेमेश्वर मसराम (३५) कडून पाच लिटर हाभ.दारु पकडली. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या बोंडगावदेवी येथील रामनाथ मेश्राम (५३) कडून देशी दारुचे सहा पव्वे, झरपडा येथील मारोती पुल्लीवार (७३) कडून देशी दारुचे ३० पव्वे, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कुणबीटोला येथील सुरेश मेश्राम (३८) कडून १० लिटर मोहफुलाची दारु, रावणवाडी पोलिसांनी कामठा येथील किशोर गजभिये (४०) कडून १० लिटर हातभट्टीची दारु, तिरोड्याच्या संत सजन वॉर्डातील रंजीत चौरे (३८) कडून १० लिटर हाभ. दारु, वडेगाव येथील रामचंद्र बिंझाडे (६७) कडून पाच लिटर हाभ. दारु,देवरी तालुक्याच्या पिंडकेपार येथील मिलींद टेंभुरकर (४६) कडून देशी दारुचे ९० पव्वे, देवरी येथील भोजराज कांबळे (४०) कडून देशी दारुचे सहा पव्वे, ठानेगाव येथील राष्ट्रपाल गजभिये (५५) कडून पाच लिटर हाभ. दारु जप्त करण्यात आली. गोंदिया शहराच्या संजयनगर येथील विजय गडपायले (५२) कडून आठ लिटर हाभ. दारु, संविधान चौकातील बंडू मेश्राम (३५) कडून पाच लिटर हाभ.दारु, अर्जुनी-मोरगाव येथील शंकर मेश्राम कडून देशी दारुचे नऊ पव्वे, नवेगावबांध पोलिसांनी पंचमुर्ती वॉर्डातील योगेश देशमुख (३१) कडून देशी दारुचे ३० पव्वे, रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत कटंगीकला येथील देवीदास मेश्राम (६६) कडून देशी दारुचे २५ पव्वे, कुडवाटोली येथील मनोज निकोसे (४२) कडून पाच लिटर मोहफुलाची दारु,तिरोडा तालुक्याच्या केसलवाडा येथील विनोद बालचंद कनोजे (३२) याच्याकडून १० लिटर हाभ.दारु जप्त करण्यात आली.