शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मालवाहतुकीतून आगाराला चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

कोरोना हा संसर्गजन्य आजार असून देशात शिरकाव होताच त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टीने शासनाने उपाययोजना म्हणून अवघ्या देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन केला आहे. अशात प्रवासी वाहतुकीतून कोरोना प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे, एसटी, विमान व अन्य प्रवासी माध्यमांवर बंदी लावण्यात आली होती. यामुळे मात्र अगोदरच तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे या लॉकडाऊनने कंबरडे मोडले होते.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाचा प्रयोग : आगाराच्या आतापर्यंत ३५ बुकींग

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रवासी वाहतुकीतून कोरोनाचा संसर्ग पसरू नये या दृष्टीने राज्य शासनाने लालपरीवर बंदी लावली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने आता एसटीतून मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यानुसार, गोंदिया आगाराने आतापर्यंत ३५ बुकींग केल्या असून त्यातून आगाराच्या तिजोरीत ३ लाख ९२ हजार ५६४ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार असून देशात शिरकाव होताच त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टीने शासनाने उपाययोजना म्हणून अवघ्या देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन केला आहे. अशात प्रवासी वाहतुकीतून कोरोना प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे, एसटी, विमान व अन्य प्रवासी माध्यमांवर बंदी लावण्यात आली होती. यामुळे मात्र अगोदरच तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे या लॉकडाऊनने कंबरडे मोडले होते.अशात हळूहळू राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करीत राज्य परिवहन महामंडळाला जिल्ह्यातंर्गत फेऱ्यांसाठी मंजुरी दिली. मात्र नागरिक घराबाहेर निघणे व त्यातही गर्दीत वावरणे टाळत असल्याने एसटीला तेवढा प्रतिसाद मिळणे कठीण दिसत होते. असेच सुरू राहिल्यास झालेले नुकसान भरून काढणे शक्य होणार नाही. याकरिता महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग प्रथमच सुरू केला. त्यामुळे आता लालपरी प्रवाशांसोबतच मालवाहतुकीचे काम करू लागली आहे. या मालवाहतुकीच्या प्रयोगात गोंदिया आगाराने आतापर्यंत ३५ बुकींग पूर्ण केल्या असून त्यातून तीन लाख ९२ हजार ५६४ रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.जुलै महिन्यात मिळाला उत्तम प्रतिसादआगाराला जून महिन्यात ४ बुकींग मिळाल्या व त्यातून १३ हजार ७६५ रूपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले. जुलै महिन्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १४ बुकींगमधून आगाराला ९९ हजार ५६५ रूपये, ऑगस्ट महिन्यात १० बुकींग केल्या असून त्यातून एक लाख ४९ हजार ६५४रूपये, सप्टेंबर महिन्यात ५ बुकींगमधून ८२ हजार ६०० रूपये तर तर ऑक्टोबर महिन्यात २ बुकींग केल्या असून त्यातून ४६ हजार ९८० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सुरक्षित वाहतूक असल्याने विश्वासकोरोनामुळे बसलेला फटका भरून काढण्यासाठी एसटी आता मालवाहतुकीत आल्याने त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय एसटी १० टन क्षमतेची परवानगी आहे. तर ट्रांसपोर्ट त्यापेक्षा जास्त क्षमतेची बुकींग घेऊन घेतात. तरिही एसटी सर्वांच्या विश्वासाची असल्याने लवकरच या क्षेत्रातही त्यांची चांगली पकड निर्माण होणार यात शंका नाही.

टॅग्स :state transportएसटी