शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ सुगत चंद्रिकापुरे यांची घर वापसी; तीन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

By अंकुश गुंडावार | Updated: February 22, 2024 12:46 IST

सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 अर्जुनी मोरगाव - अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ सुगत यांनी तीन नगरसेवकांसह कोहमारा येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गुरुवारी (२२) प्रवेश केला आहे. २६ मे २०२३ रोजी त्यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला होता. त्यांच्या या  घर वापसीमुळे विधानसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी येणार आहे. 

डॉ सुगत हे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी चे नगराध्यक्षांसह इतर १३ नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेत गेले होते. अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी घर वापसी केली आहे. गुरुवारी कोहमारा येथील एरिया ५१ येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राकाचे प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नगरसेवक दानेश साखरे यांचे उपस्थितीत अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, बांधकाम सभापती सागर आरेकर व नगरसेविका दीक्षा शहारे यांचेसह डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात डॉ सुगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून मतदार संघाच्या विकासासाठी अमाप निधी आणला असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या घर वापसी मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस