लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : लोधी समाजाला राज्य सरकारच्या गॅझेटमध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कक्षात असलेल्या कोणत्याही योजनेचा किंवा पदाचा लाभ लोधी समाजाला मिळत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये ही लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात उल्लेखीत करावे अशी विनंती लोधी समाजाने केंद्र शासनाकडे केली आहे.लोधी समाजाचे नेते माजी आ. भेरसिंह नागपुरे यांच्या नेतृत्वात सालेकसा, आमगाव तालुक्यातील लोधी समाजाच्या कार्यकर्त्यांसह गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील समाजबांधवांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्याशी नवी दिल्ली येथे त्यांच्या मंत्रालयात भेट घेतली. लोधी समाजाची व्यथा मांडली. केंद्राच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली.थावरचंद गहलोत यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. लोधी समाजाला न्याय देण्याची ग्वाही दिली.शिष्टमंडळात माजी आ. भेरसिंह नागपुरे यांच्यासह रविंद्र ओलावार, प्रशांत वाघरे, भारत खटिक, रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघटे, घनश्याम अग्रवाल, झामसिंग येरणे यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ही भेट घेतली. त्यांनाही या प्रश्नाबद्दल सविस्तर सांगून निवेदन दिले.त्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.
लोधी समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST
लोधी समाजाला राज्य सरकारच्या गॅझेटमध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कक्षात असलेल्या कोणत्याही योजनेचा किंवा पदाचा लाभ लोधी समाजाला मिळत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये ही लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात उल्लेखीत करावे अशी विनंती लोधी समाजाने केंद्र शासनाकडे केली आहे.
लोधी समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा
ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे मागणी : राज्याप्रमाणे केंद्रातही लाभ मिळावा