शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.जे.बागडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.

ठळक मुद्देखमारी गावाची निवड : समतादूत राबविणार महिनाभर उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा : खेड्यापाड्यातील सर्व जाती, धर्माच्या लोकांसह महिलांनी भारतीय राज्यघटना कळावी, त्यात दिलेले न्याय, समता, बंधुत्व आणि एकात्मता हे मूलभूत हक्क समजावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)च्या ‘समतादूत’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभर संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी ७० व्या संविधान दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.जे.बागडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली. या वेळी सर्वांना संविधानाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी गावातून प्रभातफेरी काढून विविध घोषवाक्ये देत संविधानाची जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीचे संचालन निखील मानकर, उमेश लांजेवार, रजत उके, आशिष मंडिया या विद्यार्थ्यांनी केली. संविधान साक्षर ग्रामच्या उद्घाटनासाठी शिक्षक रंगारी, बोरकर, लाडे, धोटे, फुंडे, सारंगपुरे, रहांगडाले, ओगारे, चौधरी, बागडे, पारधी, गडवार, चव्हाण, बुडेकर यांनी सहकार्य केले. संविधान साक्षर ग्राम उपक्रमांतर्गत खमारी येथे संपूर्ण महिनाभर स्वच्छता अभियान, नागरिक व बचत गटांना माहिती, आरोग्य शिबिर समाजकल्याणच्या योजनांची माहिती असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, नागपूर विभागीय प्रकल्प संचालक पंकज माने, गोंदिया जिल्हा प्रकल्प अधिकारी योगीता ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील समतादूत करुणा मेश्राम, शारदा कळस्कर, मुनेश रहांगडाले, मनिष बिजेवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन