शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवाल तर तुरुंगवारी अटळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:46 IST

सोशल मीडियावर खबरदारी घेण्याचा सल्ला: तक्रार आल्यास होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात अनेक ठिकाणी सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ शेअर केले जात असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अश्लील फोटो, व्हिडीओ, चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर केल्याची तक्रार आल्यास संबंधिताला थेट जेलची हवा खावी लागणार आहे.

मोबाइल, सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत. व्हॉट्सअॅप यासह सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकारही राज्यात वाढीस लागले आहेत. नुकतेच गोरेगाव तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही असले प्रकार घडू नयेत म्हणून सायबर पोलिस स्टेशन सतर्क झाले असून, सोशल मीडियावर अश्लील संदेश, व्हिडीओ, फोटो शेअर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. 

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अनोळखी ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ नये. मोबाइलमधून अश्लील संदेश, फोटो, व्हिडीओ शेअर करणाऱ्याला थेट जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन अश्लील संदेश, फोटो शेअर होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला सायबर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिला.

मुलांवर लक्ष ठेवा सध्या उन्हाळी सुट्या असल्याने मुले मोबाइलच्या आहारी जात असल्याचे दिसून येते. वयाच्या १०, ११ व्या वर्षानंतर मुले मोबाइल, इंटरनेटवर काय पाहत राहतात, यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. आपला मुलगा एखादा अश्लील व्हिडीओ किंवा फोटो तर पाहत नाही ना, शेअर करीत नाही ना. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फोटो, व्हिडीओ, चुकीचे संदेश इतरांना शेअर करू नये. असे केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सात वर्षापर्यंत शिक्षाचाइल्ड पोर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर, संबंधित व्हिडीओ पाहणे, संग्रहित ठेवल्यास अथवा वितरण केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. पोक्सो कायद्यातील सुधारित प्रस्तावानुसार या गुन्ह्यात दंड व पाच वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे, असे सायबर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी सांगितले. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाSocial Viralसोशल व्हायरल