शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात येथे करा गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन; शहरात दोन ठिकाणी राहणार कृत्रिम जलकुंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:41 IST

लायन्स क्लबकडून विसर्जनासाठी सोय : नगर परिषद करणार सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन नदी-नाल्यांत केले जात असून त्यामुळे पाणी प्रदूषण होते. अशात पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून कृत्रिम जलकुंड तयार करून त्यात गणरायाचे विसर्जन करण्यात यावे असे शासनाकडून सांगितले जाते. त्यानुसार, येथील लायन्स क्लबकडून शहरात दोन ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केले जाणार असून त्यात गणरायाचे विसर्जन करण्याची सोय शहरवासीयांना उपलब्ध होणार आहे.

कान्होबा, गणपती, दुर्गा, शारदा मातेचे विसर्जन नदी-नाल्यांमध्ये केले जाते. मूर्ती विसर्जन करीत असतानाच त्यांचे निर्माल्यसुद्धा नदी-नाल्यांत टाकून दिले जाते. अशात जल प्रदूषित होते. दुर्गा-शारदा मातेच्या मूर्ती मोठ्या राहत असल्याने त्यांचे विसर्जन कृत्रिम जलकुंडात करणे शक्य नाही. मात्र गणरायाच्या घरगुती मूर्ती तसेच मध्यम आकाराच्या मूर्ती जलकुंडात विसर्जित होऊ शकतात. शिवाय, गणपतीची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने गणरायाचे विसर्जन जलकुंडात करण्याबाबत शासनाकडूनही जोर दिला जातो. शिवाय, स्थानिक प्रशासनाला तशा सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या सूचना दिल्या जातात. 

त्यानुसार, बहुतांश शहरांमध्ये नगर परिषद किवा महानगर पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करून शहरवासीयांच्या घरातील गणरायाचे विसर्जन केले जाते. येथे मात्र लायन्स क्लबकडून दरवर्षी कृत्रिम जलकुंड तयार केले जात असून यंदाही लायन्स क्लबनेच यासाठी पुढाकार घेतला आहे. तर नगर परिषद केवळ आपले काही कर्मचारी विसर्जनासाठी देणार असून एवढेच सहकार्य करणार असल्याची माहिती आहे. 

नगर परिषदेची उदासीनता शहरात ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करून नगर परिषदेने गणरायाच्या विसर्जनाची सोय शहरवासीयांना उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र नगर परिषद याबाबत उदासीन दिसून येत आहे. लायन्स क्लबच्या जलकुंडात आपले कर्मचारी देऊन नगर परिषद धन्यता मानत आहे. या कार्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेणे अपेक्षित असतानाच सामाजिक संस्थांना पुढे यावे लागत आहे ही शोकांतिकाच आहे.

येथे राहणार कृत्रिम जलकुंड लायन्स क्लबकडून यंदा सुभाष बागेत तसेच नगर परिषद कार्यालयालगत हिंदी टाऊन स्कूलमध्ये जलकुंड तयार केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन जलकुंडांमध्ये शहरवासीयांना गणरायाचे विसर्जन करता येणार आहे. विशेष म्हणजे, शहरात हजारावर घरांमध्ये गणरायांची स्थापना केली जाते. अशात हे फक्त दोन जलकुंड तयार केले जात आहेत. त्यातही पुलापलीकडील नागरिकांसाठी एकही जलकुंड नसल्याने त्यांना नदी-नाले, विहीर यामध्येच गणरायाचे विसर्जन करावे लागणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024