शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

तंटामुक्त गाव मोहिमेमुळे अवैध दारूविक्रेत्यांना लगाम

By admin | Updated: October 13, 2016 01:59 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत ...

भट्ट्यांना बसतोय आळा : अवैध दारूमुळे गावाचे वातावरण झाले होते दूषितगोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली. कालांतराने सुरू होणाऱ्या या दारू विक्रेत्यांना आता तुरुंगात डांबण्याची मोहीम सुरू केल्याने त्या दारू विक्रेत्याची माहिती पोलिसांना पुरुवण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम सक्रीय झाली आहे.गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय. एस.१००७ /सी.आर.२३८ /पोल-८ दि. १९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस.१००८/ सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८ /६६९/ प्र.क्र.८१ /0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले. या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत होती. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत होती. त्या दृष्टीने गावात तंटे होणार नाही यासाठी अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पोलिसांची मदत घेऊन आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद पाडली. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्या बंद पाडल्या. गोंदिया जिल्ह्यातील जवळजवळ दीड हजार दारूभट्ट्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी बंद पाडल्या. या अवैध दारूविक्रीवर जे कुटुंब चालत होते, अशा कुटुंबांतील सदस्यांना समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण देऊन त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविले. तंटामुक्त गाव समितीच्या या उपक्रमामुळे दररोज सायंकाळी होणारे तंटे शांत झाले. गावाचे वातावरण शांततेकडे वळू लागले. आता या समित्यांनी जुगाराच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावातील चौकाचौकांत किंवा अनेकांच्या घरी खेळले जाणारे जुगार त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर आणते. त्यांच्यात कामाबद्दल उदासीनता वाढून काही न करता पैसे मिळावे, अशी धारणा निर्माण होते. म्हणून या जुगार अड्ड्यांवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कार्यकर्ते पोलिसांसोबत धाड घालून जुगार खेळणे बंद करणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्ट्या बंद झाल्या आहेत. परंतु अनेक दारूभट्ट्या लपूनछपून अजूनही सुरू आहेत. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. या अवैध दारूवर आळा घालण्यासाठी व तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी पोलिसांनी समित्यांना सहकार्य करावे, अशी मागणी समित्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)