शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:38 IST

मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : गरारटोला येथे काँग्रेस बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. येथील आमदार व शासनाचे बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम गरारटोला येथील मंदिरासमोर गुरुवारी (दि.११) आयोजित पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन माजी सभापती वसंत पुराम यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सरपंच चंद्रकला कावळे, उपसरपंच नुरचंद नाईक, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बळीराम कोटवार, कार्यकर्ता नमन गुप्ता, तारकेश्वर हरदुले, प्यारेलाल उजवणे, चुन्नीलाल भोगारे, माजी सरपंच वच्छला कोवे, सुरज मिरी, नकुल सोनवाने, महिला धुवगोंड, समाजाचे पुष्पा ओटी, धुरसिंग मडावी, पत्रकार श्रावण कवडो, धमाजी जेंगठे, रामदास थाटमुर्रे, शामलाल मडावी, अध्यक्ष हंसराज ठाकरे, बाबुराव मडावी, महाराज जगन मोहुर्ले, वासुदेव वाढई, ताराचंद चनाप, आनंद मडावी, किर्तन प्रचारी, बाबुलाल सपाटे, माजी ग्रा.पं. सदस्य रघुनाथ कोल्हे, ग्रा.पं. सदस्य बिसेन हरदुले, धन्नुकला पुराम, गौतम मिरी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, येथील एमआयडीसीमध्ये एकही उद्योग सुरु झाला नाही. त्यामुळे या भागातील अनेक बेरोजगार रोजगाराच्या शोधात शहाराकडे धाव घेत आहेत. पालांदूर (जमी.) या क्षेत्रात लिफ्ट इरिगेशन सुरु झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटलेले नाही. या तालुक्यात एखादे अ‍ॅग्रीकल्चर टुरीझम सुरु झाले असते तर या ठिकाणी विविध पीक उत्पादनांविषयी प्रशिक्षण मिळाले असते. त्यामुळे येथील शेतकरी हा व्यापारी शेतकरी बनून त्याचे जिवनमान व उत्पादनात वाढ झाली असती असे सांगीतले. यावेळी १०० बुथ कार्यकर्त्यांना बुथ परिचय कार्यकर्ता कार्ड कोरोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर निकोडे यांनी मांडले. संचालन किसन चौधरी यांनी केले. आभार वासुदेव वाढई यांनी मानले.

टॅग्स :congressकाँग्रेस